लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : आकांक्षित गडचिरोली जिल्हा योजनेंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात कुरखेडा, गडचिरोली, चामोर्शी, भामरागड या तालुक्यातील प्रत्येकी ३५ याप्रमाणे एकूण १४० युवक युवतींची निवड करण्यात आली आहे. तज्ज्ञांकडून प्रशिक्षणातील सहभागी युवक-युवतींना उद्योग निर्मितीचे धडे दिले जात आहेत.सिडबी स्माल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक आॅफ इंडिया व सीएससीएसपीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने चारही तालुक्यात ३ आॅक्टोबरपासून पाच दिवशीय उद्यम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा समारोप ७ आॅक्टोबर रोजी होणार आहे.सदर कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराच्या उपलब्ध असलेल्या संधी, निवडावयाचे क्षेत्र, तांत्रिक ज्ञान, व्यवहार कौशल्य, मार्केटींग व बँकींग व्यवहार आदीबाबतची माहिती दिली जात आहे.प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बेरोजगारांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात बेरोजगार युवक युवतींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिडबी स्माल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक आॅफ इंडियाचे नागपूर विभागाचे सहायक क्षेत्रीय व्यवस्थापक निलेश कुंभारे यांनी सदर चार ठिकाणी सुरू असलेल्या प्रशिक्षण स्थळाला भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांशी चर्चा केली.आॅनलाईन प्रक्रियेद्वारे कर्ज मिळविण्यासाठी अर्ज सादर केल्यास सदर अर्ज त्या-त्या क्षेत्रातील तीन बँकांना प्राप्त होणार आहे. कर्जाबाबतची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन पूर्ण करावयाची आहे. त्यामुळे नवीन उद्योजकाला पूर्वी होणारा त्रास आता होणार नाही. त्यामुळे बेरोजगारांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीएससीएसपीव्हीचे विभागीय व्यवस्थापक निलेश कुंभारे यांनी सांगितले.एलईडी बल्ब निर्मिती, सॅनिटरी पॅड या उत्पादनासारखे लघु उद्योग सुरू होऊ शकतात. त्यासाठी युवकांची ईच्छाशक्ती महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. कुरखेडा येथील प्रशिक्षण कार्यक्रमाला नाशिर हाशमी उपस्थित होते. त्यांनी यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती दिली.
बेरोजगारांना उद्योग निर्मितीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 1:22 AM
आकांक्षित गडचिरोली जिल्हा योजनेंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात कुरखेडा, गडचिरोली, चामोर्शी, भामरागड या तालुक्यातील प्रत्येकी ३५ याप्रमाणे एकूण १४० युवक युवतींची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे१४० प्रशिक्षणार्थ्यांची निवड : आकांक्षित जिल्हा योजनेंतर्गत चार तालुक्यात कार्यशाळा