शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

चला, व्यसनाला बदनाम करू!

By admin | Published: January 02, 2016 8:34 AM

युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याने सुजाण व व्यसनमुक्त समाज निर्मितीस अडथळा येत आहे. युवा

गडचिरोली : युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याने सुजाण व व्यसनमुक्त समाज निर्मितीस अडथळा येत आहे. युवा व्यसनांच्या आहारी गेल्यास केवळ वैयक्तिकच नाही तर समाजाचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे व्यसनांच्या दुष्परिणामांची जनजागृती शुक्रवारी शहरात रॅलीद्वारे नववर्षाच्या निमित्ताने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी अंनिसच्या नेतृत्त्वात ‘चला व्यसनाला बदनाम करू’ अशा घोषणा देत व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश दिला. नवीन वर्ष सुख, समृद्धीचे जावे, आजचे व्यसनाधीन युवक योग्य मार्गाला लागावेत या हेतूने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सर्वाेदय मंडळ, अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समिती, अण्णा हजारे विचारमंचच्या पुढाकारातून सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत श्री गुरूदेव प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. इंदिरा गांधी चौकातून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गांनी रॅली काढून व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प नागरिकांनी करावा, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. रॅलीत गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, श्री गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, मुरलीधर बद्दलवार, पंडित पुडके, रोहिदास राऊत, प्रा. देवानंद कामडी, संदीप कांबळे, पी. बी. ठाकरे तसेच विविध कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीच्या समारोपानंतर मार्गदर्शन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)