लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्यातील दोन महिन्यांच्या सुट्यानंतर २६ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहात जावा, शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करावा, असे निर्देश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. त्यानुसार शाळांची तयारी पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा पुन्हा सज्ज झाल्या आहेत.पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यासाठी त्याच्या आयुष्यातील शाळेचा पहिला दिवस आहे. इतर वर्गातील विद्यार्थी सुध्दा एक वर्ग पुढे गेलेले असतात. नवीन पुस्तके, नवीन वर्गखोली, नवीन सवंगडी यामुळे इतर वर्गातील विद्यार्थ्यांनाही शाळेच्या पहिल्या दिवसाबाबत उत्सुकता असते. विद्यार्थ्यांचा हा आनंद पुन्हा द्विगुणीत करण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. उन्हाळ्यामध्ये वर्गखोल्यांमध्ये साचलेली धूळ साफ करून वर्गखोल्या स्वच्छ करण्यात आल्या आहेत.पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावे, यासाठी शिक्षण विभागाने एक महिन्यापूर्वीच पुस्तके शाळांना उपलब्ध करून दिल्या आहेत. पहिल्या दिवशी पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. पहिली ते आठवीपर्यंत एकूण १ लाख १६ हजार ९१० विद्यार्थी प्रवेशीत आहेत. नियोजनात कोणताही कसूर राहू नये, यासाठी केंद्र, तालुकास्तरावर मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या सभा घेऊन आढावा घेण्यात आला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी अध्यापनापेक्षा विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधण्यावर शिक्षकांनी भर देण्याचे निर्देश आहेत.गणवेशासाठी ३ कोटी ६४ लाखांचा निधीसमग्र शिक्षा अभियानांंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिले जातात. शासनाने गणवेशासाठी ३ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी नुकताच उपलब्ध करून दिला आहे. निधी मिळण्यास उशीर झाल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन गणवेश मिळण्याची आशा धूसर झाली आहे. जिल्ह्यातील ६० हजार ७४३ विद्यार्थी गणवेशाच्या अनुदानासाठी पात्र ठरले आहेत.
चला जाऊया शाळेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:18 AM
उन्हाळ्यातील दोन महिन्यांच्या सुट्यानंतर २६ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहात जावा, शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करावा, असे निर्देश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.
ठळक मुद्देआज पहिला दिवस : विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज