लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जीवन हे मानवाला प्राप्त झालेले जीवन हे अतिशय सुंदर आहे. स्वत:वर विश्वास ठेवून जीवन जगल्यास आत्मसंतुष्टीचा मार्ग सापडतो. आज निर्माण झालेल्या अडचणी प्रयत्नांनी कायमच्या नष्ट होतात. त्यामुळे अडचणींमुळे दुखी होऊ नका. त्या सोडविण्याचा प्रयत्न करा. तेव्हा जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडेल, असे प्रतिपादन पुणे येथील व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले.रेझींग डे निमित्त पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून पोलिसांसाठी ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर तणावमुक्त व्याख्यानाचे आयोजन बुधवारी गडचिरोली येथे करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, प्रभारी पोलीस अधीक्षक प्रदीप चौगावकर, आदर्श मित्र मंडळ पुणेचे संस्थापक उदय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ३६ पोलिसांचे कुटुंबिय व ७५ पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.प्रा.गणेश शिंदे यांनी सांगितले की, आपल्याला ईश्वराने मानवी जीवन दिले आहे. आपले हे जीवन स्वच्छ व सुंदर आहे. ते आपण तणाव विरहीत हसत-हसत जगावे. देश रक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने जवानांवर आहे. आपण एका हातात शास्त्र व एका हातात शस्त्र घेऊन दिवसरात्र पहारा देत आहात म्हणून या देशातील सर्व नागरिक सुखाने व निवांत झोपत आहेत. उन, वारा, पाऊस व थंडीत विविध संकटावर मात करीत आपण देश रक्षणाचे काम करीत आहात. घनदाट जंगलात आपण वाट काढीत नक्षल्यांशी लढत आहात. म्हणून आपल्या कार्याला सर्व जनता सलाम करते. घरापासून व कुटूंबापासून लांब अंतरावर राहून देश सेवेचे व्रत हाती घेतले आहे. म्हणून आपण तनावरहीत जीवन हसत-हसत जगावे. एका पेक्षा अनेकांनी हसत राहील्यास तणाव नक्कीच कमी होतो. म्हणून तुम्ही हसा व दुसºयाला हसवा, असे शेवटी आपल्या व्याख्यानातून प्रा.गणेश शिंदे यांनी सांगितले. संचालन पोलीस उपनिरीक्षक यशवंत नलावडे यांनी केले.
जीवन सुंदर आहे, हसत-हसत जगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:19 AM
जीवन हे मानवाला प्राप्त झालेले जीवन हे अतिशय सुंदर आहे. स्वत:वर विश्वास ठेवून जीवन जगल्यास आत्मसंतुष्टीचा मार्ग सापडतो. आज निर्माण झालेल्या अडचणी प्रयत्नांनी कायमच्या नष्ट होतात. त्यामुळे अडचणींमुळे दुखी होऊ नका. त्या सोडविण्याचा प्रयत्न करा.
ठळक मुद्देगणेश शिंदे यांचे गडचिरोली येथे व्याख्यान : पोलीस अधिकारी, कर्मचारी कुटुंबीयांसाठी तणावमुक्त शिबिर