लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : क्षुल्लक कारणावरुन शेजारी इसमाचा खून करणाºया दोन जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुधाकर राजन्ना दुर्गे व बसवय्या दुर्गे रा.छल्लेवाडा ता.अहेरी अशी दोषी भावंडांची नावे आहेत.११ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास छल्लेवाडा येथील सुधाकर राजन्ना दुर्गे हा आपल्या मित्रासह घरासमोरील रस्त्यावर उभा होता. त्यावेळी विश्वनाथ समय्या दुर्गे हा रस्त्याने बैलगाडी हाकलत होता. त्यावेळी सुधाकरने विश्वनाथला हाक मारली असता दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर विश्वनाथ आपल्या घरी निघून गेला. मात्र, त्याने रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास हरिनाथ व सुनील या आपल्या भावांना घेऊन सुधाकर दुर्गे याचे घर गाठले. ते येताना दिसताच सुधाकरने बसवय्या राजाराम दुर्गे याच्या मदतीने हरिनाथ दुर्गे याच्या पोटात चाकूने वार केला. शिवाय हरिनाथचा भाऊ सुनीलच्या पोटात त्याने चाकू खुपसला. उपचारादरम्यान हरिनाथ दुर्गेचा मृत्यू झाला.फिर्यादीनंतर रेपनपल्ली पोलिसांनी सुधाकर व बसवय्या दुर्गे यांच्यावर भादंवि कलम ३०२, ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. तपासाअंती पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल दुरपडे यांनी आरोपींविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी सुधाकर राजन्ना दुर्गे व बसवय्या दुर्गे यांच्यावर कलम ३०२ अन्वये जन्मठेप व एक हजार रुपये दंड आणि कलम ३०७ अन्वये १० वर्षांचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक शरद मेश्राम यांनी जबाबदारी सांभाळली.
शेजाऱ्याचा खून करणाऱ्या दोन भावांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 12:25 AM
क्षुल्लक कारणावरुन शेजारी इसमाचा खून करणाºया दोन जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुधाकर राजन्ना दुर्गे व बसवय्या दुर्गे रा.छल्लेवाडा ता.अहेरी अशी दोषी भावंडांची नावे आहेत.
ठळक मुद्देन्यायालयाचा निकाल : छल्लेवाडात घडला होता थरार