निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात किमान १७ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या किमान ११ हजार ५०० अशी जागा शिल्लक आहे. मागील सरकारने ०३ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयात (उच्च शिक्षण) नमूद केल्याप्रमाणे ४० टक्केनुसार सहायक प्राध्यापकांच्या एकूण ३ हजार ५८० रिक्त जागांपैकी १५०० जागा भरण्यात आलेल्या आहेत. कोविड - १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ०४ मे २०२० रोजी वित्त विभागाने शासन परिपत्रक निर्गमित करून प्राध्यापक पद भरतीवर निर्बंध घातले आहेत, तसेच सीएचबी व हंगामी स्वरूपातील प्राध्यापकांचे अनेक प्रश्न धूळ खात आहेत. या प्राध्यापकांना सद्यस्थितीत नोकरीची कोणतीही हमी नाही. मुख्यमंत्र्यांनी एका शिष्टमंडळाला सीएचबी प्राध्यापकाला आहे त्या जागेवर कायम करू, असे आश्वासन दिले होते; परंतु त्यावर निर्णय झाला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
आंदाेलनात संघटनेचे अध्यक्ष अविनाश भुरसे, सागर कामडी, राेशन नासरे, शुभम बुटले, अतुल अंबादे, राहुल साधुलवार, दयानंद मेश्राम हे सहभागाी झाले हाेते.