लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून दोन वाहनांसह ५ लाख ३२ हजार रूपयांची दारू जप्त केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्याजवळ घडली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये स्वप्नील हरिदास उंदीरवाडे (१९) रा. इंदिरानगर, अरविंद दशरथ चिचुलकर (१९), दीपक प्रभाकर मानकर (२८), कुंदन विजय बालमवार (२४) यांचा समावेश आहे. तर प्रशांत उर्फ पिंटू मंडल असे फरार आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.रात्रीच्या सुमारास गडचिरोली शहरातून दारूची तस्करी होणार असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्याजवळ सापळा रचला. दरम्यान एक दुचाकी संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने दुचाकीची तपासणी केली असता, १२ हजार रूपयांची दारू आढळून आली. पुन्हा एमएच-३१ सीवी-५४२३ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, या वाहनात १ लाख ९२ हजाराची देशी दारू आढळली. दोन वाहनांसह एकूण ५ लाख ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दोन लाख रुपयांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 10:13 PM
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून दोन वाहनांसह ५ लाख ३२ हजार रूपयांची दारू जप्त केल्याची ...
ठळक मुद्देचार जणांना अटक : गडचिरोलीतील खरपुंडी नाक्यावर कारवाई