शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

नक्षलग्रस्त गडचिरोलीत सात हजार नागरिकांचे अहिंसा संदेशाचे श्रवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 4:56 PM

नक्षल्यांच्या हिंसक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत शनिवारी अहिंसेचा संदेश ग्रहण करण्यासाठी तब्बल ७०४१ विद्यार्थी व नागरिकांनी हजेरी लावून एका जागतिक विक्रमाला ओलांडले.

ठळक मुद्देतुर्कस्तानचा विश्वविक्रम ओलांडलागिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसकडून निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: नक्षल्यांच्या हिंसक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत शनिवारी अहिंसेचा संदेश ग्रहण करण्यासाठी तब्बल ७०४१ विद्यार्थी व नागरिकांनी हजेरी लावून एका जागतिक विक्रमाला ओलांडले. एका लेखकाच्या पुस्तकातील उतारा एकाचवेळी इतक्या लोकांनी श्रवण करण्याचा हा नवा जागतिक विक्र म ठरणार आहे. त्यासाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसच्या वतीने निरीक्षणही करण्यात आले.यापूर्वी अशा प्रकारच्या श्रवणासाठी ५ हजार ७५० जणांची उपस्थिती नोंदविण्याचा विश्वविक्र म तुर्कस्तानच्या नावावर आहे.सकाळी ९ वाजतापासून जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याच्या विविध भागातून विद्यार्थी व नागरिकांचा मैदानात प्रवेश सुरू झाला. दुपारी २ वाजता ७०४१ जणांची नोंदणी झाल्यानंतर पुण्याच्या आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप यांनी ‘गांधी विचार आणि अहिंसा’ या पुस्तकातील उताऱ्याचे वाचन केले. तत्पूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही कार्यक्र मस्थळी येऊन या उपक्र माचे कौतुक केले. यातून शांततेचा संदेश नागरिकांपर्यंत जाईल, असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.या रेकॉर्डचे निरीक्षण नोंदविण्यासाठी गिनीज बुकच्या वतीने कन्सलटंट मिलींद वेर्लेकर व त्यांची चमू उपस्थित होती. उपस्थितांच्या हातांवर बारकोड असलेले पट्टे बांधून उपस्थितीची नोंद डिजीटल पद्धतीने करण्यात आली. याशिवाय विविध अटींची पूर्तता करण्यात आली असून विविध कॅमेऱ्यांनी टिपलेल्या निरीक्षणांचा अभ्यास व अटींची पूर्तता तपासल्यानंतर २० दिवसांनी विश्वविक्र माबाबतची अधिकृत घोषणा होईल, असे वेर्लेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हा पोलीस दल, आदर्श मित्र मंडळ, उडान फाऊंडेशन, लक्ष्मीनृसिंग पतसंस्था आदींच्या पुढाकारातून या कार्यक्र माचे आयोजन केले होते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी