लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर साहित्य संमेलन गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर २० ते २१ जानेवारी रोजी होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन शनिवारी दुपारी १२ वाजता होईल.साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.अविनाश डोळस राहतील. उद्घाटन आ.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे राहतील. यावेळी सिनेकलाकार मिलींद गुणाजी, सिनेतारका डॉ.सरोज कुथे पाटील यांची उपस्थिती साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण राहणार आहे.संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड.राम मेश्राम आहेत. प्रमुख अतिथी म्हणून राजरतन आंबेडकर मुंबई, भन्ते राजरत्न, डी.व्ही. मेश्राम, डॉ. संजय मून, डॉ. विजय रामटेके, डी.एन. चापले, प्रा. राजेश कांबळे, अनिल म्हशाखेत्री, अभियंता विजय मेश्राम आदी मान्यवर उपस्थित राहतील.दुसºया दिवशी साहित्यिक वैशाली डोळस, वसंत शेंडे, प्राचार्य दिलीप चौधरी, डॉ. चंद्रशेखर बांबोळे, निशा शेंडे, प्रा. सरिता सातरडे, उपसभापती विलास दशमुखे, बाळकृष्ण बांबोळे, सुमेध तुरे आदी उपस्थित राहतील.या साहित्य संमेलनाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मुनिश्वर बोरकर, अॅड. राम मेश्राम, अॅड. शांताराम उंदीरवाडे, प्रफुल्ल रामटेके, दिलीप गोवर्धन, मारोती भैसारे यांनी केले आहे. साहित्य संमेलनाला मोठी गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य मंडप उभारण्यात आला आहे.
आजपासून साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:57 AM
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर साहित्य संमेलन गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर २० ते २१ जानेवारी रोजी होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन शनिवारी दुपारी १२ वाजता होईल.
ठळक मुद्देसिनेकलावंतांची उपस्थिती : आंबेडकरी साहित्यिकांची मांदियाळी