लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हाळा/मोहटोला : गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथून चंद्रपूर येथे कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणारे दोन ट्रक देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा/मोहटोला गावाजवळ अडवून ६० जनावरांची सुटका केली आहे. सदर कारवाई ८ आॅक्टोबरच्या रात्री २ वाजता करण्यात आली. याप्रकरणी तिघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.दोन ट्रकमध्ये जनावरांना कोंबून त्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी यांना प्राप्त झाली. त्यानुसार रमाकांत ठेंगरी, हिरालाल शेंडे व इतर चौघांनी किन्हाळा/मोहटोला गावाजवळ पाळत ठेवून ट्रक अडविले. ट्रकची पाहणी केली असता, एमएच-३४-एव्ही-०५१८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये ३९ जनावरे कोंबून ठेवण्यात आली होती. तर एमएच-३४-एव्ही-१२०५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २१ जनावरे आढळून आली. या सर्व जनावरांची अंदाजीत किंमत १४ लाख ३० हजार रूपये एवढी होते. दोन ट्रकही पोलिसांनी जप्त केली असून ट्रकची किंमत १० लाख रूपये एवढी होते.ट्रक पकडल्यानंतर याबाबतची माहिती देसाईगंज पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी शेख फारूख शेख नासीर (२६) रा. बल्लारपूर, ऐजाज सुलेमान खान (३४) रा. गडचांदूर, शेख सद्दाम शेख कदीर (२०) रा. बल्लारपूर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सदर जनावरे कोंढाळा व जुनी वडसा येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आली आहेत. जनावरांची सुटका करण्याच्या कामात किन्हाळा/मोहटोला ग्रामपंचायतीचे सरंपच हिरालाल शिंदे, वसंता दोनाडकर, नवलाजी मेश्राम, रवींद्र उरकुडे, सूरज लोथे, विनोद ठेंगरे, अरविंद घुटके यांनी सहकार्य केले.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार रवींद्र कुळमेथे करीत आहेत.
कत्तलीसाठी नेणाºया ६० जनावरांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 11:54 PM
गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथून चंद्रपूर येथे कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणारे दोन ट्रक देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा/मोहटोला गावाजवळ अडवून ६० जनावरांची सुटका केली आहे.
ठळक मुद्देतिघांना अटक : मोहटोला गावाजवळ कारवाई; दोन ट्रकने केली जात होती वाहतूक