शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कत्तलखान्यात जाणाऱ्या ८४ गोवंशांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:06 AM

तीन ट्रकमधे भरून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या गोवंशांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून जीवदान दिले. ८७ पैकी ३ गोवंश मृत आढळली. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.

ठळक मुद्देतीन ट्रक पकडले : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार

ऑनलाईन लोकमतकोरची (गडचिरोली) : तीन ट्रकमधे भरून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या गोवंशांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून जीवदान दिले. ८७ पैकी ३ गोवंश मृत आढळली. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, कोरची तालुक़्यातील बजरंग दल कार्यकर्त्यांनी बेडगाव/टेमली फाट्याजवळ गोवंशांनी भरलेले तीन ट्रक पकडले. एमएच-२९-टी-००२९, टीएस-१२-यूबी ३३६० आणि एबी-२१-टीबी ४१६९ या तीन ट्रकमध्ये गायी व बैल कोंबून भरलेले होते. त्यांना थांबविल्यानंतर बेडगाव पोलीस मदत केंद्रातील पीएसआय चेतन ढेकने यांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ तिथे पोहोचून चौकशी केली असता तीन ट्रकमध्ये ८७ गोवंशांना कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळले.याप्रकरणी आरोपी शेख अख्तर शेख प्यारेसाहब (४२) रा. मुलनगर खलासी लाईन, शिवमंदिर रोड नागपूर, एमडीलाल चानपाशा मोहम्मद (३०) रा. असरगंज (तेलंगणा), अहमदमिया पाशामिया कुरेशी (३४) रा. मिर्झापूर (तेलंगणा) या तीन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.या कारवाईसाठी बजरंग दल शाखा कोरचीचे संयोजक विलास उईके, सहसंयोजक हेमराज दर्रो, नगरमंत्री विशाल गोटा, विद्यालय प्रमुख सतीश नुरूटी, नगर संयोजक वासू देवांगण, नरेंद्र सलामे, आकाश हिडामी, चंद्रशेखर सांडील, राहुल बेरूपवार, चेतन मेश्राम, अनुप बखर, महेश बखर, नंदू सोनार, ब्रितलाल बकचोरिया, अविनाश कुंभरे, चैनूराम फुलकुंवर, विकास सयाम, पुरूषोत्तम सांडील, हरीशचंद्र सहाडा आदींनी सहकार्य केले.ब्रह्मपुरीच्या गोशाळेत पाठविलेया गोवंशांना ठेवण्यासाठी कोंडवाड्यातील जागा कमी पडणार असे दिसून आल्यानंतर गुन्हा दाखल करुन सर्व जनावरांना ब्रम्हपूरी (जि.चंद्रपूर) येथील गोशाळेत पाठविण्यात आले. आज सकाळी दोन ट्रकमधील जनावरे उतरवत असताना तीन जनावरे मृत आढळली.

टॅग्स :Crimeगुन्हा