लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असलेला ट्रक पकडून १५ जनावरांना जीवनदान देण्यात आले आहे.तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जनावरे नेली जात असल्याची गोपनिय माहिती जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांना प्राप्त झाली. त्यानुसार जिमलगट्टा टी पॉर्इंटवर रात्रभर पाळत ठेवण्यात आली. रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास कमलापूर परिसरातून छल्लेवाडा येथील मल्लेश कोपुलवार यांच्या मालकीच्या दोन वाहनामध्ये १५ जनावरे टाकून त्यांना तेलंगणा राज्यात नेले जात होते. सदर ट्रक पकडून जनावरांची सुटका केली. जनावरांना चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारा येथील एका गो शाळेत पाठविण्यात आले. या घटनेत एकूण आठ आरोपींचा सहभाग आहे. तेलंगणा येथील सात जण आहेत. कमलापूर येथील एक व्यक्ती कमिशनवर जनावरे खरेदी करून पाठवित होता.या सर्वांच्या विरोधात जिमलगट्टा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील शेळके करीत आहेत.
पोलिसांमुळे जनावरांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:45 AM
कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असलेला ट्रक पकडून १५ जनावरांना जीवनदान देण्यात आले आहे. तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जनावरे नेली जात असल्याची गोपनिय माहिती जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांना प्राप्त झाली.
ठळक मुद्देजिमलगट्टा येथील घटना : कत्तलीसाठी ट्रकने वाहतूक