शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
2
भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
3
"उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट
4
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
5
MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
7
दोन मुली एकाच मुलाच्या पडल्या प्रेमात, कुटुंबीय अडथळा ठरत असल्याने गेले पळून, अखेर...  
8
भयंकर! आईने ५० रुपये न दिल्याने 'त्याने' रागाच्या भरात आजीला बाल्कनीतून खाली फेकलं अन्...
9
Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?
10
अजित पवारांच्या बड्या नेत्याला विनातिकीट ठाकरे गटात प्रवेश; कोकणात मोठा धक्का
11
दिल्लीसह देशातील सर्व CRPF शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांनी सुरक्षा वाढवली
12
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
13
Astro Tips: 'या' राशीची बायको मिळाली तर मित्रही तुमच्या नशिबाचा हेवा करतील!
14
BSNL ची नवी सुरुवात; नवा LOGO पाहिलात का? सोबतच ७ नव्या सेवा, हाय स्पीड इंटरनेटही
15
Sukesh Chandrashekar : "४८ तासांत रोख रक्कम..."; सुकेश चंद्रशेखरची करण जोहरला मोठी ऑफर, जॅकलिनचंही घेतलं नाव
16
परदेशात स्थायिक झालेल्या मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई
17
"माझ्याविरोधात मोदी, शाहांच्या सभा घ्या, मला आघाडी वाढवायला मदत होईल’’, रोहित पवारांचा टोला 
18
60 वर्षांचे झाले अमित शाह; किती आहे त्यांची नेटवर्थ अन् कोणकोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक? जाणून घ्या
19
Diwali 2024: दिवाळीत घरच नाही तर अंगण-उंबरठाही स्वच्छ ठेवा; तेच असते लक्ष्मीचे प्रवेशद्वार!
20
७ लाख रुपयांचा जीवन विमा तीन वर्षांसाठी मिळेल मोफत; EPFO ​​ने १२ महिने सतत सेवेची अटही हटवली

शेतकऱ्यांना जनावर न देताच पशुधन अधिकाऱ्याने हडपले पैसे

By admin | Published: June 22, 2016 12:46 AM

आरमोरी पंचायत समितींतर्गत येणाऱ्या देशपूर गावच्या सात शेतकऱ्यांना विशेष घटक योजनेतून वर्ष २०१५-१६ मध्ये दोन गाई व दोन म्हशी,

गडचिरोली : आरमोरी पंचायत समितींतर्गत येणाऱ्या देशपूर गावच्या सात शेतकऱ्यांना विशेष घटक योजनेतून वर्ष २०१५-१६ मध्ये दोन गाई व दोन म्हशी, १० शेळ्या देण्याची योजना होती. या योजनेतून जनावर न देता या लाभार्थी शेतकऱ्यांचे पैसे आरमोरी पंचायत समितीचे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. भदाने यांनी हडप केल्याचा गंभीर आरोप सात शेतकऱ्यांनी गडचिरोली येथे मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात आपल्याला तत्काळ न्याय देण्यात यावा, अन्यथा आपण तीव्र आंदोलन करू, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांनी दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तथा नवबौध्द प्रवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी वर्ष २०१५-१६ मध्ये शासनामार्फत पंचायत समितीस्तरावर विशेष घटक योजना राबविण्यात आली. या योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला दोन गायी किंवा दोन म्हशी व १० शेळ्या देण्यात येणार होत्या. दोन गाई किंवा दोन म्हशींची किंमत ८४ हजार तर १० शेळ्यांची किंमत ४८ हजार रूपये अशी होती. लाभार्थी हिस्सा शेळ्यांसाठी १२ हजार ५०० रूपये गाई व म्हशीसाठी २२ हजार रूपये घेण्यात आले. देशपूर येथील गार्इंचे चार तर शेळ्यांचे तीन लाभार्थी या योजनेसाठी मिळाले. त्यानंतर पंचायत समितीचे प्रभारी पशुधन अधिकारी डॉ. भदाने यांच्याकडे शेतकऱ्यांनी संपर्क साधला. तेव्हा डॉ. भदाने यांनी तुम्ही आपल्या परिसरातील जनावर खरेदी करा, नागपूर भागातील जनावर गडचिरोलीच्या वातावरणा सूट होणार नाही, असा सल्ला दिला व शेतकऱ्यांकडील अ‍ॅडव्हॉन्स रक्कम आपल्याकडे ठेवून घेतली. त्यानंतर भदाने यांनी ही रक्कम गहाळ केली व सरळ कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर यांच्याकडून जनावर खरेदी केल्याच्या पावत्याच आणून दिल्या. लाभार्थ्यांच्या सह्या व आंगठे ते घेऊन गेले. एक महिन्यानंतर आम्हाला आरमोरीच्या बाजारात प्रत्येकी २०० रूपये देऊन बिल्ले लावलेल्या जनावरासोबत आमचा फोटो काढून घेतला. ती जनावरे घरी आणली. मात्र पशुधन विकास अधिकाऱ्यांनी जनावर ेविक्रेत्यांच्या मालकाला पैसे दिले नाही म्हणून सर्वच जनावरे घेऊन गेले. आमची शुध्द फसवणूक झाली आहे. या प्रकरणी प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. भदाने हे जबाबदार आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शेतकरी ऋषी तानू सिडाम, चंद्रभान तुळशीराम सिडाम, तुकाराम बाजीराव तुमराम, परशुराम तुकाराम सहारे, चंद्रभान सदाशिव उंदीरवाडे, अरूण सदाशिव उंदीरवाडे, निलेश देविदास ंउंदीरवाडे या शेतकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. या संदर्भात आरमोरी पं.स.चे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. भदाने यांना विचारणा केली असता, या शेतकऱ्यांना जनावरे दिली आहेत. त्यांनी ती विकली असावीत, असे ते म्हणाले. (नगर प्रतिनिधी)