औषधांची विक्री न करण्याचे निर्देश : अन्न व औषध प्रशासनाची परवानगीच नाहीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अन्न व औषध प्रशासन विभागा परवानगी न घेताच मागील तीन वर्षांपासून वन विभागाच्या मार्फतीने गोंडवाना हर्ब्स वनौषधी प्रकल्प चालविला जात होता. ही बाब अन्न व औषध प्रशासन विभागाच्या लक्षात आल्यानंतर १५ दिवसांच्या आत अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेण्याबाबतची नोटीस प्रकल्पाला बजाविली होती. वन विभागाने तत्पूर्वीच वनौषधी प्रकल्प कुलूपबंद करून ठेवला आहे. गोंडवाना हर्ब्स प्रकल्पाच्या माध्यमातून आयुर्वेदीक औषधी तयार करून विकली जात होती. त्यामुळे या प्रकल्पाला अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेणे आवश्यक होते. मात्र वन विभागाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवानगीच घेतली नाही. मागील तीन वर्षांपासून परवानगी शिवाय अवैध पध्दतीने औषधांची विक्री केली जात होती. ही अतिशय गंभीर बाब असल्याने याबाबतची तक्रार काही नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरिक्षकांनी चौकशी केली असता, परवानगी नसल्याचे निदर्शनास आले. १५ दिवसांच्या आत अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घ्यावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा गोंडवाना हर्ब्सच्या व्यवस्थापक मंडळाला दिला. त्याचबरोबर परवानगी मिळाल्याशिवाय औषधांची विक्री करू नये, अशी ताकीदही दिली. त्यानंतर वन विभागाने स्वत:च प्रकल्पाला कुलूप बंद केले आहे. लाखो रूपयांची औषधी तयार करणाऱ्या प्रकल्पाला वन विभागाने अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेतली नाही. याबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गोंडवाना हर्ब्स प्रकल्पाला कुलूप
By admin | Published: May 23, 2017 12:43 AM