शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
3
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
4
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
5
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
6
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
7
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
8
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
9
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
10
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
11
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
12
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
13
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
14
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
15
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
16
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
18
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
19
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
20
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक

जनसुरक्षेसाठी लॉकडाऊन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 5:00 AM

रेशन दुकानांमधून मिळणारे धान्य वेळेत मिळण्याबाबत प्रशासनाला त्यांनी सूचित केले. जिल्ह्यातील गरजू लोकांना आवश्यक व शासनाने मंजूर केलेले धान्य वाटप होण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या. दुर्गम भागात रेशनचे धान्य पावसाळ्याआधी पोहचविण्यासंदर्भातील उपाययोजनांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

ठळक मुद्देआढावा बैठकीत पालकमंत्र्यांची स्पष्टोक्ती : २० एप्रिलनंतर महामार्गासह इतर कामांना गती येणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाची भूमिका लॉकडाऊन करून जनतेला अडचणीत आणण्याची नसून त्यांच्या सुरक्षेसाठीच सर्वकाही केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. कोरोना संसर्ग व त्याअनुषंगाने लागू केलेल्या संचारबंदीसंदर्भात ना.वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जि.प.सदस्य अ‍ॅड.रामभाऊ मेश्राम आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, स्थलांतरीत लोकांची व्यवस्था याबाबत आढावा घेण्यात आला. संचारबंदीची योग्य अंमलबजावणी आणि नागरिकांचे मिळालेले सहकार्य यामुळे गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त आहे. यापुढेही आपल्याला ही लढाई सुरू ठेवायची आहे. यादरम्यान काही लोकांना अडचणी निर्माण होत आहेत, मात्र प्रशासन त्यासाठी आवश्यक ती मदत वेळेत पोहोचवत आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा पुढेही अखंड सुरू राहील. नागरीकांनी काळजी करू नये, असा दिलासा पालकमंत्र्यांनी दिला.रेशन दुकानांमधून मिळणारे धान्य वेळेत मिळण्याबाबत प्रशासनाला त्यांनी सूचित केले. जिल्ह्यातील गरजू लोकांना आवश्यक व शासनाने मंजूर केलेले धान्य वाटप होण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या. दुर्गम भागात रेशनचे धान्य पावसाळ्याआधी पोहचविण्यासंदर्भातील उपाययोजनांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.जिल्हा कोरोनामुक्त राहण्यासाठी बाहेरील व्यक्ती आत येता कामा नये. जिल्ह्यात येण्यासाठी गरजूंच्या कारणांची छाणणी करा. अत्यावश्यक कारण असेल तरच त्यांची तपासणी करून प्रवेश देण्यात यावा, असे त्यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितले. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्ह्याबाहेर राहू नये. जर असे लोक बाहेरु न आले तर त्यांना क्वारंटाईन करण्याची सूचनाही ना.वडेट्टीवार यांनी केली.शेतीविषयक कामांना अडथळे नाहीतशेतीविषयक कामांना कोणत्याही प्रकारे प्रशासनाकडून बंधने नाहीत. शेतकऱ्यांनी आपली कामे करावीत. फक्त हे करताना गर्दी टाळून कोरोना संसर्गाचा धोका दूर ठेवावा, असे पालकमंत्र्यानी स्पष्ट केले.संचारबंदीमुळे सर्वच कामांना बंदी घालण्यात आली होती. त्याचा फटका तेंदूपत्ता संकलनालाही बसला. तेंदूपत्ता संकलन हा जिल्ह्यातील महत्वाचा व्यवसाय असून त्याबाबत आता परवानगी देता येईल, अशी सूचनाही या बैठकीत ना.वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी