लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात यावे, याबाबत अनेकदा चर्चा व मागणी करूनही शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीष मने यांच्या नेतृत्वात आरमोरी येथील ईटियाडोह कार्यालयाला कुलूप ठोकले.जोपर्यंत पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने शेवटी २० सप्टेंबरला सायंकाळपर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणार, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. पावसाने दडी मारल्यामुळे आरमोरी, अरसोडा, कासवी, आष्टा, अतरंजी, वघाळा, पालोरा या गावातील शेतकºयांचे धानपीक पाण्याअभावी करपायला लागले. सदर गावातील शेतकऱ्यांना निस्तार हक्काद्वारे ईटियाडोहाचे पाणी लागू आहे.इटियाडोह कार्यालयाच्या सहायक अभियंत्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्ष पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी हरीष मने यांच्या नेतृत्वात इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन केले. या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करून २० सप्टेंबर सायंकाळपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी आ.डॉ.रामकृष्ण मडावी, राजू अंबानी, ज्ञानेश्वर ढवगाये, प्रेमनाथ बेहरे, धकाते, महेंद्र शेंडे, शरद भोयर, विनायक गोंधोळे, दीपक भोयर, भाऊराव बोरकर, मनोज सपाटे, कमलाकर चाटारे, राजेंद्र दिवटे, अंकुश खरवडे, दोनाडकर, धर्मा धकाते, राजू पुसे, नानू वांढरे, राजू उपासे, रवी भोयर, तलाठी दोनाडकर, अशोक ठाकरे यांच्यासह अतरंजी, आष्टा, वघाळा, अरसोडा, कासवी, पालोरा आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाण्यासाठी कुलूप ठोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:34 PM
आरमोरी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात यावे, याबाबत अनेकदा चर्चा व मागणी करूनही शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीष मने यांच्या नेतृत्वात आरमोरी येथील ईटियाडोह कार्यालयाला कुलूप ठोकले.
ठळक मुद्देइटियाडोहचे पाणी मिळणार : शिवसैनिक व शेतकरी आक्रमक