शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

Lok Sabha Election 2019; ही निवडणूक देशाच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची मतदारांना साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:39 PM

काँग्रेसने देशद्रोहासारख्या कलमाला हटविणार असल्याचे सांगितले. यातून देशाच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर घाला घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरिक्षततेसाठी महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला पुन्हा आपला कौल द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : काँग्रेसने देशद्रोहासारख्या कलमाला हटविणार असल्याचे सांगितले. यातून देशाच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर घाला घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरिक्षततेसाठी महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला पुन्हा आपला कौल द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.येथील राजे विश्वेश्वर महाराज स्टेडियममध्ये भाजपा व मित्र पक्षाच्या विजय संकल्प रॅलीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी, आ.रामदास आंबटकर, जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, सभापती सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, शिवसेनेचे राजगोपाल सुलवावर आदी पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या २० मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या उपाययोजनाही सांगितल्या.मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसच्या काळात दिल्लीतून निघालेला १ रुपयातले १५ पैसे लोकांपर्यंत पोहोचत होते. आता जनधन योजनेद्वारे १०० टक्के पैसा लोकांच्या हातात मिळत आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे ९८ टक्के लोकांकडे शौचालय आहेत. धुरमुक्त स्वयंपाकासाठी घराघरात गॅस पोहोचला आहे. या पाच वर्षात देशात सर्वच ठिकाणी वीज पोहचली असून २०२२ पर्यंत प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळाले असेल, असे त्यांनी सांगितले.देशात १३ कोटी लोकांना मुद्रा लोणद्वारे रोजगार निर्मितीसाठी मदत झाली आहे. आयुष्यमान भारत योजनेद्वारे दररोज जवळपास ५० कोटी लोकांना आरोग्यासाठी मदत होते. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना विम्यासोबतच शेतकरी, शेतमजूर, गवंडी, घरकाम, महिला व इतर लोकांना पेन्शनची योजना येणाऱ्या काळात करणार आहे.मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर सायंकाळी ४.४३ वाजता अहेरीत पोहचले व ५.१५ वाजता नागपूरकडे उडाले. या यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस कुमकही मागवण्यात आली होती.१ लाख ७७ हजार वनहक्क दावे मंजूरगडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंदे सुरू करून जिल्ह्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारने आदिवासी विकासासाठी ९ टक्के निधी राखीव करून विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. १ लाख ७७ हजार वनहक्क दावे मंजूर करण्यात आले आहेत. गैरआदिवासींचे वनहक्क दावे सुध्दा लवकरच मार्गी लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश दिला. ज्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होत आहे. गोंडी भाषेला देशाच्या भाषा सूचित आणण्यासाठीसुद्धा पक्षातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019gadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूर