लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील शेवटचे तीन दिवस आता शिल्लक आहेत. त्यामुळे युती आणि आघाडी या सामन्यातील रंगत वाढली आहे. अशात दोन्ही प्रमुख पक्षांसोबत त्यांचे मित्रपक्ष कितपत काम करीत आहेत याचा कानोसा लोकमत चमूने घेतला. त्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबतच काँग्रेसचा मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप कामाला लागल्याचे दिसून आले.सुरूवातीला सेनेच्या ठिकठिकाणच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्यात आघाडीला यश आले नव्हते. त्यामुळे पदाधिकारी कामाला लागले नव्हते. परंतू नेत्यांचे आदेश मिळाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्तेही प्रचारात रस घेऊ लागल्याचे दिसून आले.जिल्ह्यात दक्षिण भागातील अहेरी विधानसभा मतदार संघ आणि गडचिरोली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी हे दोन मतदार संघ राष्टÑवादी काँग्रेसच्या वाटेला जाणार आहेत. अशा स्थितीत आघाडीचा प्रचार म्हणजे येणाºया विधानसभेची रंगीत तालीम या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीकडे पाहात आहे. त्यामुळे अहेरी आणि गडचिरोली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक प्रमाणात सक्रिय झाल्याचे दिसून आले.शनिवारी गडचिरोलीतील आरमोरी मार्गावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यालयात अध्यक्ष विवेक बाबलवाडे, संघटन सचिव रोशन राऊत, राष्ट्रवादी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, जिल्हा कोषाध्यक्ष कबीर शेख प्रचारावरून नुकतेच येऊन बसले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार प्रत्येक गावात बुथ कमिट्या बनविल्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणे आम्हाला सोपे जात असल्याचे बाबलवाडे म्हणाले. आघाडीच्या उमेदवाराला या मतदार संघात लिड देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.६विधानसभा मतदारसंघातील मित्रपक्षाच्या कार्यालयांत काय दिसले?१. गडचिरोली : शहरात असलेले राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यालय कुलूपबंद होते. परंतू तालुका कार्यालयात पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू होती. प्रचाराची गाडीही समोरच उभी होती.२. अहेरी : अहेरी येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाड्यावरूनच सूत्र हलविली जातात. दक्षिण भागातील काही सभांमध्ये त्यांचा सहभाग होता.३. आरमोरी : येथे शहर अध्यक्ष अमिन लालाणी यांच्या घरातच राष्ट्रवादीचे कार्यालय आहे. येथे राकाँचे काही कार्यकर्ते काम करीत असल्याचे दिसून आले.४. ब्रह्मपुरी : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांचे या भागात बºयापैकी प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावल्याचे दिसून आले.५. आमगाव : गोंदिया जिल्ह्यातील आमगावमध्ये ज्येष्ठ पदाधिकारी नरेश माहेश्वरी आणि माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर आघाडीच्या उमेदवारासाठी कामाला लागले आहेत.६. चिमूर : या भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फळी कमी असल्याचे जाणवले. परंतू जे आहेत ते आघाडीसाठी काम करत असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.सर्व मित्रपक्ष आमच्यासोबतकाँग्रेसच्या प्रचाराने वेग घेतला आहे. आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, पीरिपा, शेकाप, आरपीआय, भाकपा सर्वच पक्ष आमच्यासोबत असून ते सर्वजण प्रचाराला लागले आहेत.- महेंद्र ब्राह्मणवाडेलोकसभा समन्वयक, काँग्रेसआम्ही आघाडीचा धर्म पाळणारकाँग्रेस-राष्टष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या आघाडीनुसार लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आमचे सर्व कार्यकर्ते आघाडीसाठी काम करत आहेत. आघाडीचा धर्म पाळणे आमचे कर्तव्य आहे.- धर्मरावबाबा आत्राम,ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
Lok Sabha Election 2019; गडचिरोली, अहेरी मतदारसंघात राष्ट्रवादी अधिक सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 11:53 PM
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील शेवटचे तीन दिवस आता शिल्लक आहेत. त्यामुळे युती आणि आघाडी या सामन्यातील रंगत वाढली आहे. अशात दोन्ही प्रमुख पक्षांसोबत त्यांचे मित्रपक्ष कितपत काम करीत आहेत याचा कानोसा लोकमत चमूने घेतला.
ठळक मुद्देकार्यकर्त्यांना वाहन : विधानसभेची रंगीत तालिम करण्यात व्यस्त