लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ईव्हीएम मशीनच्या विश्वसनियतेबाबत काही राजकीय पक्ष व नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर मतदानात पारदर्शकता आणण्यासाठी ईव्हीएमला व्हीव्हीपॅट मशीन जोडण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यावर्षी पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. बॅलेट युनिटजवळच व्हीव्हीपॅटची मशीन ठेवली जाणार आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याने ज्या उमेदवाराला मतदान केले, त्याचे चिन्ह व्हीव्हीपॅट मशीनवर दिसणार आहे. सदर चिन्ह केवळ सात सेकंदच दिसणार आहे. त्यानंतर चिठ्ठी खाली ठेवलेल्या बॉक्समध्ये पडणार आहे. दिसणाऱ्या कागदी स्लिपवर उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह प्रदर्शित होणार आहे.उमेदवाराने मतमोजणीदरम्यान आक्षेप नोंदविल्यास चिठ्ठ्यांचे मोजमाप करून निकाल प्रदर्शीत केला जाणार आहे.
Lok Sabha Election 2019; सात सेकंद दिसेल व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 10:20 PM