शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

Lok Sabha Election 2019; ट्रॅक्टर उलटून चार मतदार ठार तर सात गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:28 AM

शंकरपूर येथे मतदान टाकून ट्रॅक्टरने डोंगरमेंढा गावाकडे परत जात असताना ट्रॅक्टर उलटून चार मतदार ठार तर सात गंभीर जखमी झाले. १४ मतदार किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघात डोंगरमेंढा-शंकरपूर गावाच्या दरम्यान गुरूवारी दुपारी १ वाजता घडला. सर्व मतदार हे डोंगरमेंढा गावातील रहिवासी आहेत.

ठळक मुद्देडोंगरमेंढातील नागरिक : मतदान टाकून येत होते परत, उमेदवारांसह आमदारांची धाव

लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : शंकरपूर येथे मतदान टाकून ट्रॅक्टरने डोंगरमेंढा गावाकडे परत जात असताना ट्रॅक्टर उलटून चार मतदार ठार तर सात गंभीर जखमी झाले. १४ मतदार किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघात डोंगरमेंढा-शंकरपूर गावाच्या दरम्यान गुरूवारी दुपारी १ वाजता घडला. सर्व मतदार हे डोंगरमेंढा गावातील रहिवासी आहेत.हिराबाई मणिराम राऊत (७०), यमुना मुरारी मलगाम (७०), मिराबाई ईश्वर मरस्कोल्हे (५०) या तिघी जागेवरच ठार झाल्या तर कृष्णा मंसाराम कुळमेथे हे नागपूरला नेत असताना मृत्यू पावले. देवराव गोविंदा डोंगरवार (६०), सिध्दार्थ आत्माराम वैद्य (४५), दादाजी रामा मेश्राम (६५), वासुदेव मेश्राम (६०), बुधाजी कुळमेथे (३५), शांताबाई सदाशिव वलके (६५), माया दीपक ठाकरे (३५) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. यातील तिघे नागपूर येथे तर चार जण गडचिरोली येथे भरती आहेत. इतर जवळपास १४ किरकोळ जखमींवर देसाईगंज येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.डोंगरमेंढा गावाचे मतदान केंद्र शंकरपूर येथे होते. मतदान करण्यासाठी जवळपास ३५ महिला व पुरूष मतदार हे शंकरपूर येथे विनोद बुध्दे यांच्या ट्रॅक्टरने गेले होते. परत येताना चालक रामा ठाकरे मद्यधुंद अवस्थेत होता. त्यात डोंगरमेंढा गावापासून एक किमी अंतरावर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला उलटली. यामध्ये ज्या महिला व पुरूष ट्रॅक्टरखाली दबल्या गेले.अपघाताची माहिती मिळताच खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, देसाईगंजचे उपसभापती गोपाल उईके यांनी रूग्णांची भेट घेतली. आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरोली रूग्णालयात जाऊन विचारपूस केली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019