लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा आता सुरू झाला आहे. शेवटचा जोर लावण्यासाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. अशा स्थितीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पदाधिकारी भाजपसाठी जोमाने प्रचार करणार का, अशी शंका निर्माण झाली होती. परंतू शुक्रवारी (दि.५) गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मित्रपक्षासाठी प्रचाराची गुढी उभारण्याकरिता शिवसैनिक सज्ज झाल्याचे चित्र पहायला मिळाले.पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या विधानांमुळे युती होणार किंवा नाही याबाबत शिवसैनिकच सुरूवातीला साशंक होते. पण भाजप-सेनेची युती झाल्यानंतर भाजपकडून योग्य तो सन्मान मिळत नसल्याचे सांगत शिवसैनिक कामाला लागले नव्हते. दरम्यान प्रभारी जिल्हाप्रमुख विजय श्रृंगारपवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्या भावना ऐकविल्या. सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मनातील खल बोलून दाखवत कोणाचे काय चुकले याची जाणीव त्यांना करून दिली. अखेर भाजप पदाधिकाºयांनी त्यांच्या भावना समजून घेऊन युतीसाठी एकदिलाने काम करण्याची विनंती केली.लोकमत चमुने शुक्रवारी शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयाचा कानोसा घेतला असता सेनेचे पदाधिकारी प्रचाराच्या नियोजनात व्यस्त झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी तिथे गडचिरोली तालुका प्रमुख प्रा.ज्ञानेश्वर बगमारे, माजी ता.प्रमुख घनश्याम कोलते, माजी जि.प.सदस्य दिवाकर भोयर, रमेश मंगर आदी उपस्थित होते. उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार हेसुद्धा प्रचारात पुढाकार घेऊन शिवसैनिकांना कामी लावत आहेत.सहा विधानसभा मतदार संघातही शिवसैनिक गुढीपाडव्यापासून अधिक जोमाने प्रचार कार्याला भिडणार असल्याचे सेनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले.
गैरसमज दूर, आता योग्य समन्वयतालुकास्तरावरील भाजपचे पदाधिकारी शिवसेनेच्या तेथील पदाधिकाºयांशी समन्वय ठेवत आहे. गैरसमज दूर केले आहेत. सेनेचे पदाधिकारी त्यांच्या मतदारांना आवाहन करत आहेत.- रविंद्र ओलालवार,जिल्हा सरचिटणीस, भाजप
शिवसैनिक कामाला लागलेउद्धवजींच्या आदेशाने सर्वजण कामाला लागले आहेत. मनात कोणतेही किंतू-परंतू न ठेवता प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिक मित्रपक्ष भाजपच्या विजयासाठी प्रयत्नशिल आहेत.- विजय श्रृंगारपवार,प्र.जिल्हाध्यक्ष, शिवसेना