शिवनाथ कुंभारे यांचे आवाहन : अण्णा हजारे यांच्या कार्यावर अनेकांनी टाकला प्रकाश लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. माहितीचा अधिकार, दफ्तर दिरंगाई, सक्षम ग्रामसभा यांच्यासह भ्रष्टाचार निर्मूलनाची यशस्वी चळवळ त्यांनी चालविली. अण्णा हजारे यांचे हे कार्य पुढे नेण्यासाठी सर्व नागरिकांनी तत्पर राहिले पाहिजे, असे आवाहन भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे विश्वस्त तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी केले. अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ मुख्य शाखा गडचिरोली येथे पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोेलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा होते. यावेळी मंचावर माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, उद्धवराव बन्सोड, नानाजी वाढई, सत्यम चकिनारप, नामदेव गडपल्लीवार, डॉ. मुरलीधर बद्दलवार, जीवन विकास परीक्षा चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख बंडोपंत बोढेकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, संघटक विजय खरवडे, ग्रामसेवाधिकारी सुखदेव वेठे, जिल्हा प्रचारक जयराम खोबरागडे, पी. जे. सातार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्यांवर विस्तृतपणे प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन गुरूदेव सेवा मंडळाचे सचिव पंडितराव पुडके यांनी केले तर आभार सुरेश मांडवगडे यांनी मानले. कार्यक्रमाला महागू बारापात्रे, मडावी, पुरूषोत्तम ठाकरे, कवडू फुलबांधे, मधुकर भोयर, बापू गेडाम, दिलीप मेश्राम, पुरूषोत्तम सिडाम, देवराव भोगेवार, धनपाल मसराम, इंदू मडावी, जयभारत मसराम, बाबुराव बावणे, काशिनाथ गावतुरे, डंबाजी बावणे, भरडकर आदी उपस्थित होते. सकाळी गडचिरोली शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
भ्रष्टाचार निर्मूलनासाठी तत्पर राहा
By admin | Published: June 17, 2017 1:55 AM