रात्रीच्या सुमारास कृषिपंपाचा विद्युत प्रवाह बंद करत असल्याने शेतकऱ्याला शेतावरच पानासाठी रात्रभर जागावे लागते. रात्री विद्युत बंद झाल्यावर कधी कधी तर खूप वेळ भारनियमनाला सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे . एकीकडे शेतकऱ्याला महागाईच्या विळख्यात तर दुसरी कडे लॅकडाऊनमूळे शेतकऱ्याला नुकसानीला सामना करावा लागत आहे. धान तर भाजीपाला पिकाची लागवड करण्यात आली आहे. तरुण वर्गाला नोकरी मिळणे कठीण झाल्याने व कोरोनामुळे रोजगार बंद असल्याने अनेक तरुण शेतीकडे वळले आहेत पण शेतीला पाण्याची आवश्यकता असताना महावितरण रात्रीला विद्युत प्रवाह बंद होत असल्याने तरुण शेतकरी रोष व्यक्त करीत आहे. तर पिकांना पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. रात्री पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता विषारी सापांची भीती तर दुसरीकडे पिके सुकण्याची भीती कुरूड येथील तरुण शेतकरी अमित झुरे यांनी व्यक्त केली. यामुळे २४ तास नियमित वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
अनियमित वीजपुरवठयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:35 AM