सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य रूपाली संजय पंदीलवार, पंचायत समिती सदस्य शंकर आकरेड्डीवार, ठाकरी येथील सरपंच नंदाताई कुळसंगे तसेच उपसरपंच मधुकर दुमनवार, ग्रामसेवक इंद्रावन बारसागडे, महसूल विभागाचे तलाठी महिद्रे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. नुकसानीची भरपाई लवकर देण्यात यावी, अशी मागणी रूपाली पंदीलवार, पंचायत समिती सदस्य शंकर आकरेड्डीवार, सरपंच नंदा कुळसंगे, उपसरपंच मधुकर दुमनवार यांनी केली आहे.
पंचनाम्यानुसार, ठाकरी येथील लचमया पोचम दोमटवार याचे ५० हजार १०० रुपयांचे नुकसान झाले आहे, गजानन पोचम दोमटवार याचे २५,८३० रुपये, पुरुषोत्तम पोशया बोळकुटवार याचे २३,६०० रुपये, दिलीप गजानन बोळकूटवार ९८००, पांडुरंग जोरगलवार १८,९००, सत्यनारायण आचेवार २५,०५०, डोनय्या अशमशेट्टीवार १५, हजार, मलया बहिरेवार ५०००, तर विकास कन्नाके यांचे ३०३० रुपयांचे नुकसान झाले. तसेच ठाकरी येथील पाण्याच्या टाकीला जाणारे ८ ते १० खांब तुटले तर काही खाली पडले आहेत.