शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

दम्याच्या औषधीसाठी कोकडीत लोटला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 12:01 AM

देसाईगंज तालुकास्थळापासून सात किमी अंतरावर असलेल्या कोकडी येथे मृगनक्षत्राचे पर्वावर दम्याची औषधी घेण्यासाठी देशभरातून ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक आले होते. औषधी घेण्यासाठी दोन किमीची रांग लागली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : देसाईगंज तालुकास्थळापासून सात किमी अंतरावर असलेल्या कोकडी येथे मृगनक्षत्राचे पर्वावर दम्याची औषधी घेण्यासाठी देशभरातून ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक आले होते. औषधी घेण्यासाठी दोन किमीची रांग लागली होती. रात्री उशिरापर्यंत ही रांग कायम होती. वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या मार्गदर्शनात औषधी देण्यात आली.प्रल्हाद कावळे यांचा सेवाभावी उपक्रम मागील ३८ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. मृगनक्षत्राच्या पर्वावर शुक्रवारी १२.३० वाजेपासून मासोळीतून दमा रुग्णांना मोफत औषधी वितरित करण्यास सुरुवात झाली. यावर्षी गर्दीचा उच्चांक मोडत हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. संपूर्ण कोकडी गाव नागरिक व वाहनांच्या गर्दीने फुलून गेला होता. देसाईगंजपासून कोकडीपर्यंत वाहनांची रांग लागली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज ठाण्याचे निरीक्षक सिद्धानंद मांडवकर यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आ.कृष्णा गजबे यांनी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. तसेच पाणपोईची व्यवस्था केली. देसाईगंज पंचायत समिती व ग्रामसेवकांच्या वतीने मंडप, मॅट व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. नगर परिषद देसाईगंज, तिरूपती विद्यालय कोकडी, कृषी सहायक सुधाकर कोहळे यांनी पाणपोई उभारली. ग्रामीण रुग्णालय देसाईगंज व प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूडच्या वतीने आरोग्यसेवा पुरविण्यात आली. औषधीसाठी लागणारी मासोळी कोकडी येथील भोई बांधवांनी उपलब्ध करून दिली. औषधी वाटपासाठी कोकडी येथील ग्राम सुरक्षा दल सदस्य, युवकवर्ग, शिक्षक, कर्मचारी व गावकऱ्यांनी सहकार्य केले. गर्दीचा प्रचंड त्रास कोकडीवासीयांना सहन करावा लागत असला तरी सेवाभावाची भावना येथील नागरिकांच्या मनात अजूनही कायम असल्याने या ठिकाणी आलेल्या प्रत्येक नागरिकाचे आदरातिथ्य केले जाते, हे विशेष.उद्घाटनीय कार्यक्रमाला माजी खा. नाना पटोले, आ. कृष्णा गजबे, माजी आ. आनंदराव गेडाम, देसाईगंज पं.स. चे सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, जि.प. सदस्य रोशनी पारधी, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, अ‍ॅड. संजय गुरू, १९१ सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, माजी सभापती पसराम टिकले, नाना कांबळे, भूषण खंडाते, सरपंच सुधीर वाढई, उपसपंच वीरघरे, पोलीस पाटील पुरूषोत्तम कापगते, तंमुस अंध्यक्ष रामू सहारे, माजी सरपंच मंसाराम बुद्धे आदी उपस्थित होते.कोकडीसाठी सोयी द्यागेल्या ३८ वर्षांपासून कोकडीत दमाग्रस्तांना औषधी देण्याची निस्वार्थ सेवा प्रल्हाद कावळे व गावकरी करीत आहेत. या कार्यात परिसरातील अनेक मच्छीमार बांधव अहोरात्र सेवा देतात. पण शासन इतर संस्थांना ५-५ कोटी देत असताना या मानवतेच्या कार्यासाठी शासन कोणत्याही सोयी करीत नाही, अशी खंत माजी खा.नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :medicineऔषधं