शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

जीवाभावांची माणसं हीच सावकारांची तिजोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 1:00 AM

गडचिरोली हा मागास जिल्हा असतानाही अरविंद पोरेड्डीवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस येऊ दिली नाही. बँकांकडे प्रचंड मनुष्यबळ असते. परंतु नेतृत्व चौफेर असावं लागतं. वेगळा स्वभाव असल्याशिवाय माणसं हाताळता येत नाही.

ठळक मुद्देकुलगुरू एन.व्ही. कल्याणकर : गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली हा मागास जिल्हा असतानाही अरविंद पोरेड्डीवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस येऊ दिली नाही. बँकांकडे प्रचंड मनुष्यबळ असते. परंतु नेतृत्व चौफेर असावं लागतं. वेगळा स्वभाव असल्याशिवाय माणसं हाताळता येत नाही. अरविंद पोरेड्डीवार यांच्यात हे कौशल्य असून, आयुष्यात जीवाभावांची माणसे पोरेड्डीवार यांनी मिळविली. जीवाभावांची माणसं हीच सावकारांची तिजोरी आहे, असे गौरवोद्गार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.व्ही. कल्याणकर यांनी काढले.गोंडवाना कला दालनात गडचिरोली प्रेस क्लबतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेचा ‘गडचिरोली जिल्हा गौरव’ पुरस्कार सहकारमहर्षी अरविंद पोरेड्डीवार यांना कुलगुरु डॉ.कल्याणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष अरविंद खोब्रागडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे उपस्थित होते. यावेळी मंचावर सत्कारमूर्ती अरविंद सा. पोरेड्डीवार, एंजल देवकुले, प्रेस क्लबचे सचिव प्रा.अनिल धामोडे, उपस्थित होते.कुलगुरु डॉ.कल्याणकर पुढे म्हणाले, जिल्हा सहकारी बँका या राजकारणाचा अड्डा बनल्याची टीका करण्यात येते. परंतू अरविंद पोरेड्डीवार यांनी राजकारणासोबतच समाजकारण व अन्य क्षेत्रातही मोठी कामगिरी केली आहे. अरविंद खोब्रागडे यांनी आपल्या मनोगतात अरविंद पोरेड्डीवार यांनी पुरस्कार स्वीकारल्याने या पुरस्काराची उंची वाढल्याचे सांगितले.याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी बजावून सिकाई मार्शल आर्ट प्रकारात ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वर्ल्ड किंगचा किताब मिळविणाºया एंजल विजय देवकुले हिला पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रेस क्लबचे सदस्य विलास दशमुखे हे पंचायत समितीचे उपसभापती झाल्याबद्दल त्यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल धामोडे, संचालन महेश तिवारी यांनी तर आभार प्रदर्शन मनोज ताजने यांनी केले. कार्यक्रमाला आ.कृष्णा गजबे, प्राचार्य डॉ.कीर्तीवर्धन दीक्षित, प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, भाग्यवान खोब्रागडे, माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरड्डीवार, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शशिकांत साळवे, अनंत साळवे, श्रीहरी भंडारीवार, महेश काबरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस क्लबचे कोषाध्यक्ष अविनाश भांडेकर, सदस्य सुरेश पद्मशाली रोहिदास राऊत, सुरेश सरोदे, शेमदेव चापले, सुरेश नगराळे, नंदकिशोर काथवटे, मारोतराव मेश्राम, विलास दशमुखे, जयंत निमगडे, रूपराज वाकोडे, निलेश पटले आदींनी सहकार्य केले.सदर पुरस्कार वितरण सोहळा अतिशय नियोजनबध्द पध्दतीने पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सभागृह भरगच्च भरला होता.