शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

रिक्त पदांनी यंत्रणाच पांगळी

By admin | Published: June 18, 2017 1:19 AM

भारत देशातील अतिमागास ३३ जिल्ह्यात नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे.

२ हजार ८५१ पदे रिक्त : शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भारत देशातील अतिमागास ३३ जिल्ह्यात नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. सदर जिल्हा अविकसीत असून अद्यापही जिल्ह्यातील ५४.७ टक्के नागरिक दारिद्र्य रेषेखालील हलाकीचे जीवन जगत आहे. या लोकांना शासकीय योजनांचा लाभ देऊन तसेच विविध शासकीय सुविधा उपलब्ध करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. मात्र हे काम करणारी यंत्रणाच रिक्त पदाने पांगळी झाली असल्याने जिल्ह्याचा मानव निर्देशांक वाढण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत विविध आस्थापनांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २ हजार ८५१ पदे रिक्त आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रशासकीय कामकाज सुरळीत चालवून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी राज्य शासनाचे जिल्ह्यात एकूण २३ हजार ६२३ पदे मंजूर आहेत. यापैकी सन २०१४-१५ या वर्षात २ हजार ४१३ पदे रिक्त होती. सद्य:स्थितीत २ हजार ८५१ पदे रिक्त आहेत. दरवर्षी रिक्त पदांचा आकडा ४३८ ने वाढतच आहे. गडचिरोली जिल्ह्यात राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागाचे एकूण १२ कार्यालय (आस्थापना) आहे. या आस्थापनामध्ये एकूण वर्ग अ चे ४९४ पदे मंजूर आहेत. वर्ग ब चे १ हजार ११, वर्ग क चे १९ हजार २०२ व वर्ग ड चे २ हजार ९१६ पदे मंजूर आहेत. चारही वर्ग मिळून एकूण २३ हजार ६२६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्य:स्थितीत २ हजार ८५१ पदे रिक्त आहेत. याशिवाय राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या गोंडवाना विद्यापीठ, एसटी महामंडळ, आदिवासी विकास महामंडळ, मानव विकास महामंडळ, वीज वितरण कंपनी, अन्नधान्य वखार महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, ज्योतीबा फुले विकास महामंडळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँक, महाराष्ट्र बँक, ग्रामीण बँक, नागरी बँक तसेच केंद्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या डाक सेवा, बीएसएनएल, भारतीय पुरातत्व विभाग, खनिकर्म विभाग आदी विभागामध्ये रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील बहुतांश प्रशासकीय विभागांना रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे शिक्षण, आरोग्य सेवांवर परिणाम होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आदिवासी, नक्षलग्रस्त भाग असलेल्या अमरावती, ठाणे, पुणे, नांदेड, यवतमाळ, धुळे, नाशिक, अहमदनगर, नंदूरबार, जळगाव, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या १४ जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे ३१ डिसेंबर २०१२ पूर्वी भरण्याचे आदेश दिले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे न भरल्याने रिक्त पदाचा अनुशेष वाढला आहे. न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. - काशिनाथ भडके, सेवानिवृत्त बिडीओ, गडचिरोली सरकारसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याबाबत राज्य सरकारसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम आहे. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. मात्र नवे अधिकारी व कर्मचारी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सेवा देण्यास तयार होत नाही. यावर कठोर निर्णय राज्य सरकारने घेणे आवश्यक आहे. विद्यमान राज्य सरकार व गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी, जेणेकरून गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. वर्ग अ व ब चे अधिकारी विभागात कार्यरत असल्याशिवाय त्या विभागाच्या प्रशासकीय कामात गती येत नाही. अद्यापही अनेक कार्यालय प्रभारी अधिकाऱ्याच्या भरवशावरच आहे.