शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

महागाव घाटातून रेती तस्करी करणारे चार ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:35 PM

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन कर्मचाºयांनी तालुक्यातील महागाव नदी घाटाच्या परिसरात सापळा रचून रेतीची अवैध तस्करी करणारे

ठळक मुद्देवन विभागाची कारवाई : ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन कर्मचाºयांनी तालुक्यातील महागाव नदी घाटाच्या परिसरात सापळा रचून रेतीची अवैध तस्करी करणारे चार ट्रॅक्टर पकडल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.या प्रकरणातील ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहेरीचे क्षेत्र सहायक आर. आर. वासेकर, पी. एम. नंदगिरवार, जी. एल. नवघरे व व्ही. बी. आत्राम यांनी मिळालेल्या माहितीनुसार महागाव नदी घाटाकडे जाणाºया रस्त्याची तपासणी केली. त्यानंतर वांगेपल्ली घाटाकडेही तपासणी केली. रेतीची तस्करी करणारे ट्रॅक्टर रेती घाटाकडे न जाता वांगेपल्ली गावात परत गेल्याचे दिसून आले. दरम्यान अहेरी मार्गाने ट्रॅक्टर येत असल्याचा अंदाज वन कर्मचाºयांना आला. वन विभागाच्या पथकांनी वांगेपल्लीवरून अहेरीकडे मोर्चा वळविला. दरम्यान महागाव घाटाकडे सदर वाहने गेल्याचे वन कर्मचाºयांना समजले. महागाव नदी पात्रातून चार ट्रॅक्टर वन कर्मचाºयांनी जप्त केले. यामध्ये तीन ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये रेती भरलेली होती व एक ट्रॅक्टर रिकामे आढळून आले. ए. आर. कुमरे, विकास लांजेवार व श्रीरामे या वनकर्मचाºयांनी वन परिक्षेत्र कार्यालयात या घटनेच पंचनामा केला. एमएच ३३ एफ ३८०१ क्रमांकाचे नोंदणी नसलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सदर ट्रॅक्टर अहेरी येथील सुरेश बासबोईनवार यांच्या मालकीचे आहे. लक्ष्मण डोंगरे रा. अहेरी यांच्या मालकीचे एमएच ३३ एफ २८४१ तसेच मोहम्मद रशीद रफीक शेख यांच्या मालकीचे नोंदणी नसलेले ट्रॅक्टरचा यात समावेश आहे. घटनास्थळावर चार मजूर व चार चालक तसेच तीन ट्रॅक्टर मालक व प्रभाकर डोंगरे उपस्थित होते. या कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले.