महा-डीबीटी पोर्टलचे http:/mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल, सामुदायिक सेवा केंद्र(CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातुन संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.वैयक्तीक लाभार्थी म्हणुन नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणीत करुन घ्यावा लागेल. पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.महा-डीबीटी पोर्टलवर माहीती भरण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे. ३१ डिसेंबर २०२० अखेर पर्यत आपले अर्ज पोर्टलवर भरावे. या तारखेपर्यत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राहय धरले जातील. तरी आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,यांनी केले आहे.
महाडीबीटी पोर्टल योजना ‘अर्ज एक, योजना अनेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:44 AM