शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

महाग्रामसभेची तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:38 AM

कोरची : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी व अन्य मागण्या पूर्ण ...

कोरची : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी व अन्य मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी बुधवार, १० फेब्रुवारीला दुपारी १ वाजता गोटुल भूमी ते तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांच्या नावे तहसीलदार सी. आर. भंडारी यांना देण्यात आले.

निवेदनात शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, एमएसपी कायदा लागू करावा, दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, पीक कर्ज पुनर्गठन करण्याचे आदेश असताना बँकांकडून होणारी सक्तीची वसुली बंद करण्यात यावी, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांची काढलेली प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम तत्काळ जमा करावी. कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, प्रलंबित असलेले शेतातील वीज कनेक्शन तातडीने जोडून देण्यात यावे. तालुक्यातील एकूण २९ ग्रामपंचायतीमध्ये व कोरची नगरपंचायत क्षेत्रामध्ये शंभर दिवस पुरेल एवढी रोजगार हमीची कामे सुरू करावीत. वन हक्क प्राप्त सातबारावर धान्य खरेदी करण्यात यावी. तालुक्यात बीएसएनएलव्यतिरिक्त इतर कुठल्याही नेटवर्कची सोय नसल्यामुळे वेळेवर नेटवर्क नसताना ऑनलाइन कामे करणे व इतर कामे करण्यास अडचणी येतात. त्यामुळे जिओ किंवा वोडाफोन टॉवर उभारण्यात यावे, तालुक्यातील गाव-पाडे अद्याप महसुली गावे म्हणून घोषित झाली नाहीत. त्यांना वनहक्क कायद्याअंतर्गत महसुली गावाचा दर्जा देण्यात यावा, कोरची ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा देऊन महिला व बाल रोगतज्ज्ञांची नियुक्ती करावी. ग्रामीण रुग्णालयातच सिझर करण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांचा समावेश हाेता. गोटुल भूमी ते तहसील कार्यालयापर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. कोरची शहरातून महाग्रामसभेच्या नारेबाजीने शहर दुमदुमून गेले.

माेर्चात महाग्रामसभेचे अध्यक्ष झाडूराम हलामी, सचिव नरेंद्र सलामे, सहसचिव कुमारी जमकातन, राजाराम नैताम, कल्पना नैताम, शीतल नैताम, सियाराम हलामी, इजासाय काटेंगे, नंदकिशोर वैरागडे, रूपेश कुमरे, गणेश गावडे, राजेश नैताम, अशोक गावतुरे, मथुरा नैताम व तालुक्यातील संपूर्ण ग्रामसभेचे अध्यक्ष सचिव व नागरिक सहभागी झाले हाेते.

बाॅक्स

१३३ गावांसाठी केवळ एक राष्ट्रीयीकृत बँक

काेरची तालुक्यात १३३ गावे असून बँक ऑफ इंडियाची एकच शाखा आहे. त्यामुळे बँकेकडे तालुक्यातील फक्त ३६ गावांतील लोकांना बँक कर्ज मंजूर केले जाते. त्यामुळे तालुका मुख्यालयात भारतीय स्टेट बँकेची नवीन शाखा सुरू करण्यात यावी. शेतकऱ्यांना रोजगार हमी कायद्यांतर्गत शेती समाविष्ट बियाणे, खते, नांगरणी, रोवणी, धान कापणी, मळणी इत्यादी कामात रोजगार हमी योजनेमधून मजुरी देण्यात यावी, १३ डिसेंबर २००५ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना वन हक्क कायद्यांतर्गत तातडीने पट्टे देऊन सिंचनाची सोय करून द्यावी, शेतकऱ्यांच्या शेतीवर विहीर योजनाऐवजी बोरवेलची व्यवस्था करावी व सौरऊर्जेवर चालणारी स्ट्राेक बॅटरी कनेक्शन द्यावे, अशी मागणीही महाग्रामसभेने निवेदनातून केली.