लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी ८६ आदिवासी विद्यार्थ्यांची सहल महाराष्टÑाच्या विविध भागात नेण्यात आली. आदिवासी बहूल भागातील विद्यार्थी महाराष्टÑातील वेगवेगळ्या स्थळांचे दर्शन घेऊन भारावून गेले असल्याचे दिसून आले.अतिदुर्गम भागातील नक्षल पीडित तसेच नक्षल पाल्यांच्या यामध्ये समावेश होता. ८६ विद्यार्थी तसेच पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय अधिकाºयांचे पथक यांच्यासह ९८ जणांचा या सहलीमध्ये समावेश करण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना रेल्वे, मेट्रो, समुद्र, गेटवे आॅॅफ इंडिया, सायन्स म्युझियम, गड, किल्ले, गार्डन, एसेल वर्ड ही ठिकाणे दाखविण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्ह्याची सीमा रेषा ओलांडली नव्हती. त्यामुळे आपल्या प्रमाणेच संपूर्ण राज्यात जंगल असावे, अशाच प्रकारची गरीबी असावी असा भ्रम निर्माण झाला होता. मात्र महाराष्टÑ दर्शन सहलीतून हा भ्रम दूर होण्यास मदत झाली. महाराष्टÑाने विविध बाबतीत किती प्रगती केली आहे, हे स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत झाली आहे.१९ सप्टेंबर रोजी या विद्यार्थ्यांची १६ वी फेरी गडचिरोली येथे पोहोचली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते. या समारोपीय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सहलीदरम्यानचे अनुभव सांगितले. मनोगतादरम्यान भविष्यात आपण पोलीस, डॉक्टर, शिक्षक, वनरक्षक, उद्योजक बणून गडचिरोली जिल्ह्याची नक्षलवादी ही ओळख पुसून आर्थिक, सामाजिक, औद्योगिक व सांस्कृतिकदृष्ट्या विकसीत जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशासनाचे राजदूत बणून लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. संचालन पीएसआय तेजस्वी पाटील यांनी केले.
महाराष्टÑ दर्शनाने भारावले विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:45 AM
जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी ८६ आदिवासी विद्यार्थ्यांची सहल महाराष्टÑाच्या विविध भागात नेण्यात आली.
ठळक मुद्देप्रथमच ठेवले जिल्ह्याबाहेर पाऊल : पोलीस व आदिवासी विकास विभागाचा उपक्रम