दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्यादरम्यान विद्युत यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड कमी करण्यासाठी महावितरणने तयारी सुरू केली आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना वीज तारांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याबरोबरच अनेक वीज यंत्रांची दुरूस्तीची कामे केली आहेत.पावसाळ्यात वादळ व जोराच्या पावसामुळे वीज तारा तुटणे, जम्पर, इन्सुलेटर तुटणे, वीज खांब कोसळणे यासारख्या घटना घडतात. यामुळे जीवित व वित्तहानी होते. वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण सुध्दा वाढते. हे टाळण्यासाठी महावितरणच्या वतीने मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत.गडचिरोली सर्कलअंतर्गत ब्रह्मपुरी, गडचिरोली व आलापल्ली हे तीन विभाग येतात. या तिन्ही विभागात देखभाल व दुरूस्तीची कामे मागील एक महिन्यापासून सुरू झाली आहेत. वीज तारांजवळ आलेल्या ३ हजार ९८६ स्पॅनमधील झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. ५४९ पिन इन्सुलेटर, ७५ डिस्क इन्सुलेटर बदलविण्यात आले आहेत. २५ वीज खांबांना नवीन अर्थींग देण्यात आले आहे. ५७ ट्रान्सफार्मरमध्ये योग्य पातळीपर्यंत आॅईल टाकण्यात आले आहे. डीटीसी केबल सुध्दा बदलविण्यात आले आहे. ८२ एलटी डिस्ट्रीब्युशन बॉक्स बदलविण्यात आले आहेत. ३५० नवीन जम्पर लावले आहेत. अर्धा किमी एचटी लाईन, एलटी लाईनला गार्डींग बसविण्यात आले आहे. रोड क्रॉस होत असलेल्या जवळपास ३०० मीटरवर गार्डींग बसविण्यात आली आहे. ३५ किमीवर नवीन सर्विस वायर टाकले आहे. ३५ डिस्ट्रीब्युशन बॉक्स, ४५ डीटीसी गॅसकेट व ३०० मीटरवरील जळालेले केबल बदलविण्यात आले आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीमुळे वीज खंडीत होण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.१२० नवीन खांब लागलेविजेची संपूर्ण सुरक्षितता वीज खांबावर अवलंबून आहे. त्यामुळे वीज खांब मजबूत असणे अत्यंत आवश्यक असल्याने वीज विभाग खांबाबाबत अतिशय संवेदनशील राहते. काही दिवसानंतर लोखंडी खांब गंजतात किंवा वादळामुळे वाकतात. सदर खांब पावसळ्यात कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता अधिक राहते. परिणामी गंजलेले किंवा वाकलेले खांब बदलविण्यावर महावितरण विशेष भर देते. यावर्षी पावसाळ्यापूर्वी ११२ खांब बदलविण्यात आले आहेत. यामध्ये ब्रह्मपुरी विभागातील ५२, गडचिरोली विभागातील ५५ व आलापल्ली विभागातील पाच खांबांचा समावेश आहे.
पावसाळ्यासाठी महावितरण सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:33 PM
पावसाळ्यादरम्यान विद्युत यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड कमी करण्यासाठी महावितरणने तयारी सुरू केली आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना वीज तारांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याबरोबरच अनेक वीज यंत्रांची दुरूस्तीची कामे केली आहेत.
ठळक मुद्देधोका टाळण्याचा प्रयत्न : विद्युत उपकरणांची दुरूस्ती