शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

माेकळा प्लाॅट सांभाळणे झाले कठीण, गडचिराेलीत वाढतेय अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 5:00 AM

अशावेळी बाजूचे प्लाॅटधारक संबंधित प्लाॅटची काही जागा गिळंकृत करण्याचे प्रमाण वाढले आहे. एनएचा प्लाॅट असल्यास थाेडी फार न्याय मिळण्याची अपेक्षा राहते. मात्र जमीन खरेदी करून अनधिकृतरित्या लेआऊट पाडले असल्यास त्यातून तर न्याय मिळणे कठीण हाेऊन बसते. अशावेळी लाखाे रुपयांच्या संपत्तीवर पाणी फेरावे लागते. शहरात प्लाॅटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे प्लाॅटवर अतिक्रमण करणे व त्यातून भांडण, तंट्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. 

ठळक मुद्देखबरदारी घेण्याची गरज; अनेकांना नाहक मनस्ताप

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : माेकळ्या प्लाॅटवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण वाढले असल्याने प्लाॅट मालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा लाखाे रुपयांची संपती हडप हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही नागरिक गुंतवणूक म्हणून प्लाॅट खरेदी करतात. त्यावर अनेक वर्षे घर बांधले जात नाही. त्याचबराेबर सभाेवताल संरक्षण भिंतीचेही बांधकाम केले जात नाही. सदर व्यक्ती दुसऱ्या गावाकडे राहते. अशावेळी बाजूचे प्लाॅटधारक संबंधित प्लाॅटची काही जागा गिळंकृत करण्याचे प्रमाण वाढले आहे. एनएचा प्लाॅट असल्यास थाेडी फार न्याय मिळण्याची अपेक्षा राहते. मात्र जमीन खरेदी करून अनधिकृतरित्या लेआऊट पाडले असल्यास त्यातून तर न्याय मिळणे कठीण हाेऊन बसते. अशावेळी लाखाे रुपयांच्या संपत्तीवर पाणी फेरावे लागते. शहरात प्लाॅटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे प्लाॅटवर अतिक्रमण करणे व त्यातून भांडण, तंट्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. 

अनधिकृत प्लाॅट असल्यास न्याय मिळणे कठीण

काही नागरिक एनए नसलेले प्लाॅट खरेदी करतात. त्यामध्ये मूळ प्लाॅट मालक स्वत:च्या मताने जमिनीचे तुकडे करून लेआऊट टाकते. मात्र, याला काेणतीही अधिकृत परवानगी राहत नाही. समजा एक एकर जमीन १५ नागरिकांना विकली तर त्यांची नावे एक एकरच्या सातबारावर नाेंदविली जातात. मात्र, त्यामध्ये नकाशा राहत नाही. एखाद्याने किती जमीन खरेदी केली, त्याचा अधिकृत पुरावा राहत नाही. अशा प्लाॅटवर एखाद्याने अतिक्रमण केल्यास न्यायालयातूनही न्याय मिळणे कठीण हाेते.

एनएच्या प्लाॅटमध्ये मुख्य राेड १२ फुटांचा तर अंतर्गत राेड ६ फुटांचे असावे लागतात. ओपन स्पेस साेडावे लागते. या प्लाॅटला नगररचनाकार मंजुरी देते. प्रत्येक प्लाॅटचा स्वतंत्र नकाशा राहते. त्यामुळे एनएचे प्लाॅट महाग असले तरी नागरिकांसाठी साेयीचे ठरतात. अनधिकृत प्लाॅटमध्ये प्लाॅटमालक आपल्याच मताने ५ ते ६ मीटर जागा राेडसाठी साेडतात.

तडजाेडीवर भरप्लाॅटवर अतिक्रमण करून घर बांधल्याची पहिली तक्रार महसूल किंवा पाेलीस विभागाकडे केली जाते. मात्र, हे दाेन्ही विभाग या प्रकरणात काहीही करू शकत नाही. न्यायालयाशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, न्यायालयाचा निकाल लागण्यास विलंब हाेताे. त्यामध्ये दाेघांचेही नुकसान हाेत असल्याने तडजाेड करण्यावर भर दिला जाते. अतिक्रमण करणारा व्यक्ती ज्याच्या प्लाॅटवर अतिक्रमण झाले अशा व्यक्तीला काही पैसे देऊन प्रकरणाचा निपटारा केला जाते.

प्लॉटची अशी काळजी घ्या- प्लाॅट खरेदी केल्यानंतर आपल्या हद्दीत संरक्षक भिंत बांधणे हा सर्वांत चांगला पर्याय आहे. - प्लाॅट मालक दुसऱ्या ठिकाणी राहत असल्यास अधून-मधून प्लाॅटची पाहणी करणे आवश्यक  आहे. - बाजूचा व्यक्ती घर बांधत असल्यास ताे लेआऊट टाकताना त्याचा लेआऊट आपल्या प्लाॅटमध्ये येत नसल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

प्लाॅटवर किमान तारेचे कुंपण करावे. जागेवर बाेर्ड लावावा. एनएच्या प्लाॅटचे सर्व रेकार्ड राहत असल्याने नागरिकांनी शक्यताे एनएचेच प्लाॅट खरेदी करावे. अनधिकृत प्लाॅटवर अतिक्रमण झाल्यास न्यायालयात दाद मागणे कठीण हाेऊन बसते.- ऋषीकेश साळी, सहायक नगररचनाकार नगर परिषद गडचिराेली

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण