लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वातावरणातील समतोल बिघडलेला आहे. दुष्काळ, पाणी टंचाई, तीव्र उष्णता आदी समस्यांना सामोर जावे लागत आहे. पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी ३३ टक्के जंगल असणे आवश्यक आहे. याकरीता जनआंदोलन , लोकचळवळ उभी राहण्याकरीता शासन प्रयत्न करीत आहे. अशा स्थितीत मुबलक आॅक्सिजन पुरवठा करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याची ओळख वृक्ष लागवड व संवर्धन करून कायम ठेवा, असे आवाहन ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष तथा आमदार प्रा.अनिल सोले यांनी केले.गडचिरोली वनविभाग गडचिरोली आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ रविवारी चामोर्शी मार्गावरील सेमाना पर्यटन उद्यानात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, मुख्य वनसंरक्षक एटबॉन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, नगर परिषदेच्या अध्यक्ष योगिता पिपरे, उपवनसंरक्षक शिवाजी फुले प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.पुढे बोलतांना आमदार सोले म्हणाले, माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत तीन गरजा असल्या तरी पाणी आणि आॅक्सीजन शिवाय आपण जगू शकत नाही. याच गोष्टींसाठी वनाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. वातावरणाचा समतोल राखायचा असेल तर प्रत्येकाने उपलब्ध होईल त्या जागेवर झाडे लावावीत व संवर्धन करावे, असे आवाहन आमदार सोले यांनी केले.आमदार डॉ. होळी यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे याची जाणीव ठेवून आज १ जुलैपासून ३१ जुलैपर्यंत सर्वांनी एकतरी झाड लावावे आणि या मिशनला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले. जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी वृक्ष लागवडीसोबतच वृक्षांचे संगोपन करण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे, असे समजून ती स्विकारावी असे आवाहन केले.प्रथम ग्रीन अर्थआॅर्गनायझेशनतर्फेअसर फाऊंडेशन भंडारा येथील वैभव कोलते यांच्या कलापथकाच्या चमुने सादरीकरण करु न जनजागृतीपर संगीतमय कार्यक्र म सादर केला. कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक सुनील पेंदोरकर यांनी केले तर आभार विभागीय वनाधिकारी यांनी मानले.चामोर्शी : वन विभाग व नगर पंचायतीच्या वतीने शहरातून वृक्ष दिंडी काढण्यात आली. त्याचबरोबर सांस्कृतिक भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्षा योगीता भांडेकर, आमदार अनिल सोले, आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, उपाध्यक्ष राहूल नैताम, उपवनसंरक्षक तांबे, सहायक वनसंरक्षक मडावी, नगर पंचायत मुख्याधिकारी चव्हाण, पं.स. सभापती आनंद भांडेकर आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सोले यांनी वृक्षांचे प्रमाण कमी होत गेले तर भविष्यात पाणी व प्राणवायूची गंभीर समस्या निर्माण होईल. त्यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी, असे आवाहन केले. नगर पंचायत व कार्यकर्त्यांच्या वतीने खासदार अशोक नेते यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निसर्गाचा समतोल बिघडू नये, यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, असे आवाहन खासदारांनी केले. यावेळी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर व आमदार डॉ. होळी यांनीही मार्गदर्शन केले. संचालन दिलीप चलाख तर आभार नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते प्र.सो. गुंडावार, केशव भांडेकर, स्वप्नील वरघंटे, आनंद गण्यारपवार, प्रा. रमेश बारसागडे, विनोद गौरकार, राजू चुधरी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा- नेतेखासदार अशोक नेते म्हणाले, या निसर्गचक्र ात मानव हा प्राणी व वनस्पतीवर अवलंबून आहे. प्राणी व वनस्पती हे मानवावर नाही. तरी पण मानव हा वनाच्या झालेल्या ऱ्हासाचा प्रमुख भागीदार आहे. सृष्टीचे चक्र सुस्थितीत चालण्यासाठी वृक्ष लागवड केल्याशिवाय तरणोपाय नाही. याकरीता जनआंदोलनाची अत्यंत गरज असल्याचे ते म्हणाले. प्रत्येकाने यात खारीचा वाटा उचलून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्याची ओळख कायम ठेवा-सोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:13 AM
वातावरणातील समतोल बिघडलेला आहे. दुष्काळ, पाणी टंचाई, तीव्र उष्णता आदी समस्यांना सामोर जावे लागत आहे. पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी ३३ टक्के जंगल असणे आवश्यक आहे. याकरीता जनआंदोलन , लोकचळवळ उभी राहण्याकरीता शासन प्रयत्न करीत आहे.
ठळक मुद्देवृक्ष दिंडीसह उत्साहात सुरुवात : सेमाना पर्यटन उद्यानजवळ वृक्षारोपण करून वृक्ष लागवडीचा शुभारंभ