लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : भारतीय संविधानाने नागरिकांना जल, जंगल व जमिनीवर मालकी हक्क प्रदान केले आहे. पृथ्वीवरील मानवाच्या अस्तित्वाकरिता संसाधनांचे रक्षण होणे फार गरजेचे आहे. यासाठी तरूणांनी पुढे यावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय राईट लाईव्हलीहुड पुरस्कार प्राप्त ओडिशा येथील निमगिरी आंदोलनाचे प्रनेते प्रफुल्ल सामंतारा यांनी केले.गुजरात राज्यातील दांडी येथून १ आॅक्टोबरपासून संविधान सन्मान यात्रा काढली आहे. ही यात्रा शनिवारी कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात पोहोचली. यावेळी महाविद्यालयात ‘सुसंवाद तरूणाईशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश गोगुलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, समाजसेविका शुभदा देशमुख आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना यात्रेसोबत आलेले गुजरात येथील पर्यावरण सुरक्षा समितीचे कार्यकर्ते तथा राष्ट्रीय जनआंदोलनाचे समन्वयक कृष्णकांत यांनी सांगितले की, लोकशाही मजबूत होण्याकरिता संविधानाचे रक्षण होणे फार महत्त्वाचे आहे. गरीब श्रीमंत, शहरी, ग्रामीण असा कोणताही भेदभाव न करता, सर्वांना समान संधी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले. पुणे येथील सुनिता सु. र. यांनी सांगितले की, लोकशाहीतही चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवाज बुलंद करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाचे रक्षण व सन्मान याबाबत शपथ देण्यात आली. संचालन व आभार महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रा. नरेंद्र आरेकर यांनी केले.
मानवी अस्तित्वाकरिता संसाधने टिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 1:32 AM
भारतीय संविधानाने नागरिकांना जल, जंगल व जमिनीवर मालकी हक्क प्रदान केले आहे. पृथ्वीवरील मानवाच्या अस्तित्वाकरिता संसाधनांचे रक्षण होणे फार गरजेचे आहे. यासाठी तरूणांनी पुढे यावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय राईट लाईव्हलीहुड पुरस्कार प्राप्त ओडिशा येथील निमगिरी आंदोलनाचे प्रनेते प्रफुल्ल सामंतारा यांनी केले.
ठळक मुद्देकुरखेडात ‘सुसंवाद तरूणाईशी’ : प्रफुल्ल सामंतारा यांचे प्रतिपादन