शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

डीसीपीएस कपातीचे विवरणपत्र उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 9:42 PM

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : अशंदायी पेंशन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपातीचे सुधारीत व अचूक विवरणपत्र उपलब्ध करून ...

ठळक मुद्देकॅफोला निवेदन : जुनी पेन्शन हक्क संघटनेचे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अशंदायी पेंशन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपातीचे सुधारीत व अचूक विवरणपत्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अंशदायी पेंशन योजनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.कर्मचाऱ्यांच्या वेतनातून जेवढी रक्क कपात केली तेवढ्या रकमेचे विवरण असणे आवश्यक आहे. मात्र अनेक कर्मचाºयांच्या विवरणपत्रात चुका असल्याचे आढळून आले आहे. जुन्या कपातीचा ताळमेळ जुळत नसल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही बाब मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या लक्षात आणून देऊन अचूक विवरणपत्र कर्मचाºयांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली. कपातीचा ताळमेळ जुळविण्यासाठी कुरखेडा पंचायत समितीने अवलंबलेली पद्धती इतर पंचायत समित्यांनी अवलंबावी. शासनाकडून २५ कोटी रूपये निधी उपलब्ध झाला आहे. पूर्ण हिशोब झाल्याशिवाय शासनाचा वाटा जमा करण्यात येऊ नये. अशीही मागणी केली. चालू सत्रातील आर-३ तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच विवरणपत्र उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन सावंत यांनी दिले.आंतरजिल्हा बदलीने गडचिरोलीमध्ये आलेल्या व इतर जिल्ह्यात गेलेल्या शिक्षकांच्या डीसीपीएस जमा रक्कम व कपातीबद्दल चर्चा केली असता शिक्षक संवर्गातील अशा प्रकरणांसाठी वरीष्ठ पातळीवरून तात्काळ मार्गदर्शन मागविण्याची सूचना कॅफोंनी जि. प. कर्मचाºयांना दिली.२९ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयानूसार मृत कर्मचाऱ्यांना १० लाख रूपये शासकीय मदत देण्याची तरतूद आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, आॅक्टोबरचे वेतन दिले जाईल असे आश्वासन कॅफो यांनी दिले.निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुदेव नवघडे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश मैलारे, जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे, जिल्हा कोषाध्यक्ष विजय मुडपल्लीवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कैलास कोरोटे, गणेश आखाडे, राजू सोनटक्के, तालुकाध्यक्ष सतीश खाटेकर, दिपक सुरपाम, प्रशांत ठेंगरे, मंगेश दडमल, शेषराव कुमरे, गुरुदेव किरणापुरे, दशरथ चलाख, उमेश जेंगठे यांच्यासह महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटनचे बहुसंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.