धानोरा/ कोरची : जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, अशी मागणी धानोरा व कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांमार्फत शासनाकडे करण्यात आली. धानोरा तालुक्यात मागील दीड महिन्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची रोवणीही झालेली नाही. त्यामुळे धानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, अशी मागणी धानोरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. तहसीलदारांना निवेदन देताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी, देवनाथ लेनगुरे, जि. प. सदस्य सुखमाबाई जांगधुर्वे आदी उपस्थित होते. पीक विमा योजनेची मुदत वाढवून देण्यात यावी, धानाचे चुकारे वितरित करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. कोरची तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदारांना निवेदन देताना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शामलाल मडावी, उपाध्यक्ष मनोज अग्रवाल, माजी पं. स. सदस्य रामदास हारामी, माजी जि. प. सदस्य प्रेमिला काटेंगे, ज्योती भैसारे, हकीमुद्दीन शेख, सदरू भामानी, सरपंच शीतल नैताम, इजामसाय काटेंगे, शालिकराम कराडे, जीवन भैसारे, मेघश्याम जमकातन, रामदास कुमरे, दानशूर हलामी, नरपतसि नैताम, एच. के. भैसारे, परसराम पोरेटी, झगरू मडावी, विठ्ठल शेंडे, तुळशिराम बावनथडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
By admin | Published: August 13, 2015 12:32 AM