मारोतराव कोवासे यांचे प्रतिपादन : खेडेगाव शाळेत कार्यक्रमकुरखेडा : जिल्हा विकासाचा आराखडा आयएएस अधिकारी तयार करतात. नेते मंडळी केवळ सूचना करतात. जिल्ह्यात येणारे आयएएस अधिकारी जिल्ह्याबाहेरील असल्याने विकासाचा वस्तूनिष्ठ आराखडा तयार होत नाही. जिल्हा विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांची जाण असलेला गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आयएएस अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शिक्षण संस्थांनी आयएएस विद्यार्थी घडवावेत, असे आवाहन माजी खा. मारोतराव कोवासे यांनी केले. राणी दुर्गावती शिक्षण संस्था जोगीसाखराच्या वतीने खेडेगाव येथील मोहिनी हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर सत्कारमूर्ती म्हणून आ. क्रिष्णा गजबे, माजी आ. हरिराम वरखडे तर प्रमुख अतिथी म्हणून राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, बाबासाहेब भातकुलकर, पी. आर. आकरे, प्रा. नरेंद्र आरेकर, पं. स. सभापती शामिना उईके, उपसभापती बबन बुद्धे, पं. स. सदस्य प्रभाकर तुलावी, चांगदेव फाये, परशुराम टिकले, गीता धाबेकर, विलास ढोरे, नवनाथ धाबेकर, नगरसेवक अॅड. उमेश वालदे, अर्चना वालदे, रवींद्र गोटेफोडे, विलास गावंडे, सरपंच टेमनशहा सयाम, राम लांजेवार, भूषण खंडाते आदी उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे संस्थापक माजी आ. हरिराम वरखडे यांना भेट वस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी शैक्षणिक गुणवत्तेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहिनी हायस्कूलचे मुख्याध्यापक कापगते, संचालन केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार यांनी केले तर आभार किशोर तलमले यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आयएएस विद्यार्थी घडवा
By admin | Published: July 11, 2016 1:22 AM