लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : तालुक्यातील आंबटपल्ली येथे जि.प. शाळेला ग्रामपंचायतमार्फत डिजिटल साहित्य खरेदी करून देण्यात आले. परंतु सदर साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. या साहित्य खरेदीत प्रचंड गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साहित्य खरेदी करावयाचे होते. परंतु ग्रामसचिवाने सरपंच व शिक्षण समितीच्या पदाधिकाºयांना विश्वासात न घेता मनमर्जीने निकृष्ट व बोगस साहित्य खरेदी करून शाळेला दिले. सदर साहित्य ग्रा.पं. ला परत करण्यात आले आहेत. परंतु या प्रकरणाची अद्यापही चौकशी झाली नाही.आंबटपल्ली येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा मनमर्जीपणा हाणून पाडण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विजय खरवडे व नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
निकृष्ट साहित्याची चौैकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:25 PM
तालुक्यातील आंबटपल्ली येथे जि.प. शाळेला ग्रामपंचायतमार्फत डिजिटल साहित्य खरेदी करून देण्यात आले. परंतु सदर साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. या साहित्य खरेदीत प्रचंड गैरव्यवहार झाला आहे.
ठळक मुद्देनिवेदन : शिक्षण मंत्र्यांकडे मागणी