शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

नवशिकेपणा आला अंगलट; दुचाकी अपघातात इसम ठार

By गेापाल लाजुरकर | Published: April 19, 2023 6:00 PM

डोंगरे कुटुंबावर आघात

गडचिरोली : नवीन दुचाकी व नवशिकाऊपणा एका व्यक्तीच्या चांगलाच अंगलट आला. आपल्या नवीन दुचाकीने सिरोंचाला कामानिमित्त जात असतानाच रंगयापल्लीच्या वळणार दुचाकीवरील नियंत्रण सुटून इसम ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९:३० वाजता घडली.

चिन्नाराजम मलय्या डोंगरे (५५) रा. पोचमपल्ली असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. चिन्नाराजम डोंगरे हे पोचमपल्लीवरून सिरोंचाकडे काही कामानिमित्त जात होते. दरम्यान बामणीपासून ९ किमी अंतरावर असलेल्या रंगयापल्लीच्या एका वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यात त्यांना डोक्याला जबर मार लागला व ते जागीच ठार झाले. घटनेचा पंचनामा सिरोंचा पोलिसांनी करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला.

दोन वर्षांपूर्वी पत्नी व मुलाचाही मृत्यू

चिन्नाराजम पोचमपल्ली याचा एक मुलगा व त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वीच मृत्यू पावली. त्यामुळे डोंगरे कुटुंबावर आघात झाला होता. आता पुन्हा चिन्नाराजमचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर तिहेरी आघात झाला.

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली