लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनामुळे २४ मार्चपासून कुलुपबंद करण्यात आलेले सेमाना देवस्थान शासनाच्या आदेशानंतर साेमवारी उघडण्यात आले. आठ महिन्यांपासून हनुमानजीचे दर्शन घेण्यासाठी आतुर असलेल्या भक्तांनी साेमवारी हनुमानजीची मनाेभावे पूजा केली.गडचिराेली शहरापासून तीन किमी अंतरावर असलेले चामाेर्शी मार्गावरील सेमाना देवस्थान हे गडचिराेलीवासीयांचे आराध्य दैवत आहे. साेमवार, गुरूवार व शनिवारी येथील हनुमानजींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळत हाेती. मात्र शासनाने मंदिर, मस्जिद, चर्च व अन्य धार्मिकस्थळे कुलूपबंद करण्याचे निर्देश दिले. हा नियम सेमाना देवस्थानालाही लागू पडला व २४ मार्चपासून सेमाना देवस्थान कुलूपबंद झाले. अनेक भाविक बाहेरूनच दर्शन घेऊन परत जात हाेते. साेमवारपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिल्यानंतर सेमाना देवस्थान सुद्धा भाविकांसाठी उघडण्यात आले.साेमवारी सकाळपासूनच भाविकांची थाेडीफार गर्दी सेमाना देवस्थान परिसरात जमायला लागली. प्रत्यक्ष हनुमानजींचे दर्शन घेऊन मनाेभावे पूजा केल्याने आपल्याला आत्मिक शांती मिळाली, अशी प्रतिक्रिया भाविकांनी दिली. यानंतर आता भेट देणाऱ्यांची संख्या वाढणार आहे.
शासनाचे नियमभाविकांची गर्दी झाल्यास रांगीतील दाेन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर आवश्यक आहे. मंदिर परिसरात थुंकण्यास सक्त मनाई आहे. मंदिरात प्रवेश करताना साबणाने हातपाय स्वच्छ धुणे किंवा जंतुराेधकाने हातांचे निर्जुतीकीकरण करणे बंधनकारक आहे. आजाराची लक्षणे असल्यास प्रवेश नाकारला जाईल. काेराेनाबाबत जनजागृती करण्याची व्यवस्था धार्मिकस्थळी संबंधित व्यवस्थापनाने करावी. दर्शनासाठी जागा निश्चित करावी. प्रवेेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे असावेत. असे नियम शासनाने केले आहेत.
मंदिर उघडण्याच्या पूर्वी मंदिराचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. मंदिरात प्रवेश करतेवेळी प्रत्येकाने साेशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, यासाठी परिसरात फलक लावले जातील. तसेच कर्मचाऱ्यांमार्फतही भाविकांना सूचना दिल्या जातील. मंदिर परिसरात प्रवेश करतेवेळी प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे.- अरूण निंबाळकर, सचिव, श्री क्षेत्र सेमाना हनुमान देवस्थान समिती, गडचिराेली