जिल्ह्यातील पहिला प्रयोग : कपडे, खेळणी व चपला मिळणार धानोरा : धानोरा पोलीस ठाण्याच्या वतीने धानोरा येथे माणुसकीची भिंत उभारण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असून कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून गरजू ग्रामस्थांना विविध वस्तू (कपडे, जोडे, चप्पल, वह्या, खेळणी) आदी उपलब्ध करून देण्यात आल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी टिके यांच्या संकल्पनेतून धानोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र मुंडे, अमोल वाघमारे, जावले, सरगर यांच्या प्रयत्नातून ही संकल्पना पूर्णत्वास आली. माणुसकीची भिंत हा कार्यक्रम धानोरा बसस्थानकावर बुधवारी घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या हस्ते झाले. ज्यांच्याकडे साहित्य उपलब्ध असेल, त्यांनी देऊन जावे, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घेऊन जावे, असे आवाहन अजित टिके यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
धानोरा पोलिसांनी उभारली माणुसकीची भिंत
By admin | Published: January 06, 2017 1:39 AM