गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या जवळपास १२ लाख आहे. त्यापैकी १ मे पासून १८ वर्षे वयावरील म्हणजेच जवळपास ८ लाख ५० हजार नागरिकांना लस द्यावी लागणार आहे. ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाल्यानंतर देशभरात लसचा तुटवडा निर्माण हाेण्यास सुरुवात झाली हाेती. त्याचा फटका गडचिराेली जिल्ह्यालाही बसला. लस देण्यासाठी आराेग्य विभागाने सरकारी ६८ व २ खासगी असे एकूण ७० केंद्र सुरू केले हाेते; मात्र अनेक केंद्रांवर लसच नसल्याने नागरिकांना परत जावे लागत आहे. सध्या आराेग्य विभागाकडे ११ हजार लस शिल्लक आहेत. सध्या दरदिवशी जवळपास एक हजार नागरिकांना लस दिली जाते. त्याचा विचार केल्यास उपलब्ध साठा लवकरच संपणार आहे. नवीन साठा उपलब्ध न झाल्यास काय हाेणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
बाॅक्स
१४ टक्के उद्दिष्ट पूर्ण
-४५ वर्षे वयावरील गडचिराेली जिल्ह्यात जवळपास ४ लाख ५० हजार एवढी लाेकसंख्या आहे. त्यापैकी केवळ ६२ हजार २०९ जणांना पहिला डाेस उपलब्ध झाला आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण केवळ १४ टक्के एवढे आहे.
- १ मे नंतर ४५ वर्षे वयावरीलही नागरिक लसीकरणासाठी येणार आहेत. यांचीही गर्दी केंद्रावर उसळणार आहे, तसेच काही जणांना दुसरा डाेसही द्यावा लागणार आहे.
- १८ वर्षे वयावरील नागरिकांची केंद्रावर गर्दी उसळल्यानंतर वयस्क नागरिकांची चांगलीच अडचण हाेणार आहे.
बाॅक्स
मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा
-१ मे पासून १८ वर्षे वयावरील नागरिकांना लस देण्याविषयी वरिष्ठ स्तरावरून अजूनपर्यंत काेणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आराेग्य विभाग करीत आहे.
-सध्या प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर लसीकरण केंद्र ठेवण्यात आले आहे. यानंतर प्रत्येक उपकेंद्र स्तरावर लसीकरण केंद्र ठेवावे लागणार आहे. उपकेेंद्र स्तरावर लस ठेवण्याची व्यवस्थाही करावी लागणार आहे.
बाॅक्स
आराेग्य विभागावरील ताण वाढणार
जिल्ह्याच्या एकूण लाेकसंख्येच्या जवळपास ७० टक्के लाेकसंख्येला म्हणजेच ८ लाख ५० हजार नागरिकांना लस द्यावी लागणार आहे. त्यासाठी दरदिवशी जवळपास पाच हजार लस देण्याचे उद्दिष्ट ठेवावे लागणार आहे. त्यासाठी आराेग्य यंत्रणेवरील कामाचा ताण चांगलाच वाढणार आहे. काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्याबराेबरच लसीकरणाचेही काम करावे लागणार आहे.
बाॅक्स
अशी आहे आकडेवारी
सध्याचे लसीकरण केंद्र-७०
दरदिवशी नागरिकांना दिली जाते लस-१०००