गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ व लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा देसाईगंज हा तालुका आहे. या ठाण्याचे निरीक्षक म्हणून प्रदीप लांडे यांनी चांगली भूमिका बजावली होती. दरम्यान, लांडे यांचे अहेरी येथे स्थानांतरण झाले. त्यानंतर पोलीस ठाण्याचा प्रभार सहायक पोलीस निरीक्षक रूपाली बावनकर यांच्याकडे आला. याच कालावधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाअभावी तालुक्यात अवैध धंदे फाेफावले. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला. त्यामुळे बावनकर यांच्याऐवजी स्थायी पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष मनोज ढोरे यांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांना घेऊन गृहमंत्री व जिल्हा पाेलीस अधीक्षकांना निवेदन पाठविले हाेते. आता शहरातील अवैध धंदे, चाेरी, गुंडगिरी यासह गुन्हेगारीला आळा बसणार काय? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
देसाईगंजच्या नवीन ठाणेदारांसमाेर अनेक आव्हाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:38 AM