लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्वांसाठी अपरिचित असलेल्या कोरोनाच्या संकटाने सर्वांचेच सामाजिक जीवन ढवळून निघाले. रोजगाराच्या शोधात चार पैसे कमवण्यासाठी घरापासून कोसो दूरवर अडकून पडलेल्या नागरिकांसोबतच, हातावर आणून पानावर खाणाऱ्या गोरगरीबांची रोजीरोटी बंद झाली. पण अशा कठीण प्रसंगात सामाजिक भान ठेवत आर्थिक आणि वस्तूरूपाने मदत देण्यासाठी जिल्हाभरात शेकडो हात सरसावले आहेत. त्या सर्वांचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आभार व्यक्त मानले आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरजू, स्थलांतरित लोकांच्या मदतीसाठी अशासकीय संस्था, विविध सामाजिक गट आणि दानशूर व्यक्ती पुढे आल्या आहेत. प्रशासनाच्या सहकार्याने हे लोक आपली मदत त्या गरजवंतांपर्यंत पोहचवित आहेत. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रशासन एकीकडे संचारबंदीची अंमलबजावणी करत असताना दुसरीकडे आरोग्य सेवा पुरविण्याच्या कामातही व्यस्त आहे. अशाही स्थितीत शासनाकडून ठिकठिकाणी गरजू व स्थलांतरीत लोकांसाठी निवास व्यवस्था करण्यात येत आहे.विविध ठिकाणी घरामध्ये असलेल्या लोकांची रोजगाराअभावी उपासमार होऊ नये म्हणून त्यांना मदत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. यानंतर शेकडो लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्कसाधला.यातून निधी प्रत्यक्ष न स्विकारता त्यांच्याकडून त्याच दिवशी आवश्यक किराणा मालाचे पॅकेट तयार करून घेण्यात येत आहेत. या किराणा पॅकेटची मागणी आल्यास तत्काळ प्रशासन किंवा संबंधित संस्था किंवा व्यक्तीमार्फत गरजूला मदत दिली जात आहे.मदत वाटपासाठी जिल्हास्तरीय टिमजिल्हास्तरावर मदत वाटपासाठी टिम तयार केली आहे. यामध्ये जिल्हा माहिती अधिकारी, सहायक निबंधक, टाटा ट्रस्टच्या हर्षा वशिष्ठ व सुधाकर गावंडगावे यांचा समावेश आहे. तहसीलदार व गरजू लोकांकडून मागणी आल्यास या टिममार्फत अशासकीय संस्था, व्यक्तींशी संपर्कसाधून संबंधितांना मदत देण्याची प्रक्रि या राबविली जात आहे. ज्या ठिकाणी स्थलांतरीत अथवा गरजू लोकांना मदत हवी आहे, त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.मदत देणाºया संस्था व व्यक्तींनी प्रशासनाशी समन्वय साधावाजिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध संस्था तसेच संघटना मदत करत आहेत. त्यांनी संबंधित तहसीलदार कार्यालयाशी समन्वय साधून साहित्याचे वाटप करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कारण गरजू लोकांना मदत मिळावी व एकाच ठिकाणी वारंवार मदत टाळण्यासाठी संबंधित स्थलांतरीत लोकांची व गरजू लोकांची नोंद होणे गरजेचे आहे. त्यांना मदत करताना संबंधित संस्थांनी आपल्याकडे त्या पद्धतीने माहिती ठेवणेही आवश्यक आहे. अजून ज्यांना कोणाला मदत द्यायची असेल त्यांनी निधी स्वरूपात न देता जीवनावश्यक वस्तू स्वरूपात द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.१० दिवसांचा प्रश्न मिटविलाजिल्ह्यातील नागरिकांकडून सामाजिक बांधिलकीतून मिळालेल्या सहकार्यामुळे जवळपास २ लाख रूपयांचे किराणा साहित्य ४०० हून अधिक कुटुंबांना वेगवेळया तालुक्यात पोहोचविण्यात आले आहे. यातून त्यांचा साधारण १० दिवसांचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. याच बरोबर प्रशासनाकडून प्रत्येक तालुक्यात स्थलांतरीत लोकांसाठी निवाºयाची सोय करण्यात आली आहे. त्या ठिकाणी गरजू लोकांनी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गरजवंतांच्या मदतीसाठी सरसावले अनेक हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:00 AM
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरजू, स्थलांतरित लोकांच्या मदतीसाठी अशासकीय संस्था, विविध सामाजिक गट आणि दानशूर व्यक्ती पुढे आल्या आहेत. प्रशासनाच्या सहकार्याने हे लोक आपली मदत त्या गरजवंतांपर्यंत पोहचवित आहेत. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रशासन एकीकडे संचारबंदीची अंमलबजावणी करत असताना दुसरीकडे आरोग्य सेवा पुरविण्याच्या कामातही व्यस्त आहे.
ठळक मुद्देसामाजिक बांधिलकीचा परिचय : प्रशासनाच्या समन्वयातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप