शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

अभ्यास मंडळांवर अनेक सदस्य अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:44 AM

गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळात बहुतांश सदस्यांची अविरोध निवड झाली. प्रत्येक अभ्यास मंडळांमधून ३ याप्रमाणे ८६ अभ्यास मंडळांमधून २५८ प्रतिनिधी निवडायचे होते.

ठळक मुद्देसात मंडळांसाठीच निवडणूक : सकाळी जाहीर झाला निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळात बहुतांश सदस्यांची अविरोध निवड झाली. प्रत्येक अभ्यास मंडळांमधून ३ याप्रमाणे ८६ अभ्यास मंडळांमधून २५८ प्रतिनिधी निवडायचे होते. मात्र फक्त ३६ अभ्यास मंडळांकरिता नामनिर्देशनपत्र आले होते. त्यापैकी २९ अभ्यासकमंडळांकरिता ३ व त्यापेक्षा कमी नामांकन आले. त्यामुळे केवळ ७ अभ्यास मंडळांसाठी निवडणूक झाली.यात विज्ञान व तंत्रज्ञान गटात भौतिकशास्त्र विषयासाठी डॉ.पांडुरंग मोहरकर, रमेश ठोंबरे व रणजित मंडल, रसायनशास्त्रासाठी अपर्णा धोटे, प्रवीण जोगी, डॉ.व्ही.के. बत्रा, गणितासाठी डॉ.चेतना भोंगडे, डॉ.लालसिंग खालसा व डॉ.ज्ञानदेव वºहाडे, या गटात बिनविरोध निवडल्या गेलेल्यांमध्ये जनरल इंजिनिअरिंग अप्लाईड सायन्स अ‍ॅन्ड ह्युमॅनिटी विषयासाठी व्ही.एस.गोगुलवार, ए.एस.पावडे, एन.एस.बिसेन, इलेक्ट्रीकल इंजिनिअर विषयासाठी जाफर खान, राजेंद्र धात्रक, कॉम्प्युटर टेक्निकसाठी रहिला शेख, जीव रसायनशास्त्रसाठी डॉ.गोपाल गोंड, भूविज्ञानशास्त्रसाठी डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, डॉ. किशोर कोरडे, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्र्युमेंटेशनसाठी डॉ. अमृत लांजे, डॉ. धनंजय गहाणे, पर्यावरण विज्ञानसाठी महेंद्र ठाकरे, डॉ. बालसुब्रह्मण्यम श्रीनिवास, डॉ. केशव कळसकर, सुक्ष्म जीवशास्त्रासाठी डॉ. विजय वाढई, डॉ. प्यारेलाल कुंभारे, अजय सोळुंखे, भाषा व विज्ञानसाठी ज्योती तायगान, डॉ. मिनाक्षी तुंबडे, संभारी वरकड, प्राणीशास्त्रासाठी डॉ. लक्ष्मण रोहणकर, अमिर धमानी, गणपत देशमुख, वनस्पतीशास्त्रासाठी डॉ. वसंती रेवतकर, अनिल कोरपेनवार, संजय दुधे, सिव्हील स्थापत्य अभियांत्रिकीसाठी डॉ. ए. झेड. चिताळे, डॉ. ए. पी. सिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रविण पोटदुखे, राजेश ठोंबरे, विनोद गोरंटीवार, मायनिंग इंजिनिअरींगसाठी मनिष उत्तरवार, इन्स्ट्र्युमेंटेशन इंजिनिअरींगसाठी नवनाथ नेहे याशिवाय वाणिज्य व व्यवस्थापनसाठी डॉ. रवींद्र मुरमाडे, यशवंत घुमे, श्रीलता पिल्लई यांची निवड झाली.बिझनेस एडमिनीस्ट्रेशन अ‍ॅन्ड मॅनेजमेंटसाठी डॉ. रेखा मेश्राम, जयदेव देशमुख, उत्तम घोसरे, बिझनेस इकॉनॉमिक्ससाठी तात्याजी गेडाम, हरिश्चंद्र कामडी, डॉ. बंडू जांभुळकर, अकाऊंट स्टॅटीकस्टीकसाठी उत्तमचंद कांबळे, सुखदेव उमरे, डॉ. विजय टोंगे, विज्ञानसाठी डॉ. विश्वनाथ लाडे, डॉ. सुनिल नरांजे, चंद्रभान जीवणे, हिंदीसाठी डॉ. सुनिता बन्सोड, डॉ. कल्पना कावळे, डॉ. सरीता तिवारी, मराठीसाठी अनमोल शेंडे, डॉ. सुदर्शन दिवसे, डॉ. धनराज खानोरकर, इतिहाससाठी भुपेश चिकटे, दिवाकर कामडी, डॉ. शरद बेलोरकर, भूगोलसाठी योगेश्वर दुधपचारे, डॉ. रवींद्र रणदिवे, इंग्रजीसाठी डॉ. चंद्रमौली अमुदला, बालकृष्ण कोंगरे, सुनिल बिडवाईक, अर्थशास्त्रासाठी डॉ. पी. बी. तितरे, जनार्धन काकडे, श्रीराम कावळे, समाजशास्त्रासाठी राजेंद्र बारसागडे, डॉ. दिवाकर उराडे, पंढरी वाघ यांची निवड झाली.गृहअर्थशास्त्रासाठी सरोज झंझाळ, डॉ. वंदना वैद्य, अमिता बन्नोरे, संगीतसाठी प्रमोद रेवतकर, विधीसाठी डॉ. एम. जे. बेन्नी, इजाज शेख, इन्युघंटी राव, राज्यशास्त्रासाठी अशोक बहादुरे, डॉ. दिनकर चौधरी, अशोक खोब्रागडे, समाजकार्यासाठी डॉ. सुनिल साकुरे यांची अविरोध निवड झाली आहे.गोंडवाना विद्यापीठाचा असाही कारभारबुधवार दिनांक १३ ला सकाळी ९ वाजता गडचिरोलीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र प्रत्यक्ष शेवटचा निकाल जाहीर करण्यास गुरूवारची पहाट उगवली. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांचे चांगलेच हाल झाले. विशेष म्हणजे, मतमोजणी प्रक्रिया आटोपताच निवडणूक निकालाची जबाबदारी सांभाळणारे कुलसचिव दीपक जुनघरे मोबाईल बंद करून सायंकाळपर्यंत विद्यापीठात आलेच नाही. कुलगुरू कल्याणकर काही वेळासाठी आले पण प्रसारमाध्यमांना निकालाची प्रत शुक्रवार दिनांक १४ डिसेंबरला दिली जाईल, असे सांगत त्यांनीही विद्यापीठातून काढता पाय घेतला. या प्रकारानंतर प्रसारमाध्यमांनी संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता कुलसचिव जुनघरे यांनी निकालाची प्रत जाहीर केली.