आरमोरीत दौड स्पर्धा : वन विभागाच्या उपक्रमात शेकडो युवक सहभागी लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : आरमोरी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी २५ जून रोजी सकाळी ७.३० वाजता बडी टी-पार्इंट ते देसाईगंज मार्गावर तीन किमी अंतराची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. आरमोरीचे ठाणेदार महेश पाटील, वनपरिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. या मॅराथॉन स्पर्धेत आरमोरी व जवळपासच्या ग्रामीण भागातील शेकडो युवक सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुलांमधून संजय छत्रपती दुधबळे प्रथम, निखील अनिल जांभुळे द्वितीय, अभिषेक गंगाधर नैताम यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. मुलींमधून दीक्षा देवाजी तिजारेने प्रथम, जयश्री साईनाथ गोंदोळे द्वितीय व निकिता रामरतन दुमाने हिने तृतीय क्रमांक पटकाविला. वयस्क नागरिकांमधून प्रभाकर रामपुरकर व बळीराम वारलू गिरडकर यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविण्यात आले. इतर सहा स्पर्धकांनाही प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार महेश पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, रोशनी बैस, नंदू नाकतोडे, मनोज मने, मनोहर ज्ञानबोईनवार मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
वृक्ष लागवडीसाठी मॅरेथॉन
By admin | Published: June 26, 2017 1:09 AM