संतोष सुरपाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमार्र्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रासह तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील हजारो भाविक येणार आहेत. येथील वैनगंगेच्या पात्रात स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.मार्र्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असते. यंदा एक महिन्यापूर्वी महाशिवरात्रीचे पर्व येत असून यात्रा भरणार आहे. १३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यात्रेतील भाविकांसाठी प्रशासनाच्या वतीने विविध सोयीसुविधा तसेच उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्याचे कामही प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे बसगाड्यांची व्यवस्था करण्यात येणार असून चामोर्शी पोलीस ठाण्यातर्फे तगडा बंदोबस्त राहणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची चमू सक्रिय झाली असून चाचपणी सुद्धा करण्यात आली आहे. स्थानिक व फराडा, मोहुर्ली, रामाळा, घारगावकडे जाणाऱ्या भाविकांना मार्ग उपलब्ध आहे. मात्र मंजूर असलेल्या या कामाची दुरूस्ती न झाल्याने नागरिकांकडून प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त केली जात आहे. मार्गाच्या कामासाठी निधीही प्राप्त झाल्याची माहिती आहे.जल, जंगल, जमिनीवर ग्रामपंचायतीचा अधिकार असतो,. परंतु यात्रेतील संपूर्ण कर वसुली पंचायत समिती प्रशासन वसूल करीत असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे संपूर्ण यात्रेची कर वसुली करण्याचे अधिकार मार्र्कंडादेव ग्रा.पं.ला द्यावे, अशी चर्चा ग्रा.पं. पदाधिकारी करीत आहेत. मार्र्कंडादेव येथील कर नाका बंद केल्याने लाखो रूपयांचा कर बुडाला आहे.
मार्र्कं डात उसळणार जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:04 AM
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रासह तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील हजारो भाविक येणार आहेत.
ठळक मुद्दे१३ फेब्रुवारीपासून यात्रा : प्रशासनाच्या वतीने विविध सोयीसुविधा राहणार