आॅनलाईन लोकमतमार्र्कंडादेव : चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे अगदी रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे टाकण्यात आले आहे. याचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना होतो. त्याचबरोबर १५ दिवसानंतर या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरणार आहे. भाविकांनाही कचºयाच्या ढिगांचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने सदर ढीग उचलावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.मार्र्कं डादेव येथील वॉर्ड क्र. १ मधील संतोष सुरपाम व रेमाजी सरपे यांच्या घराजवळ अगदी रस्त्याच्या बाजूला काही नागरिकांनी शेणखताची खड्डे तयार केले आहेत. शेण, मलमुत्र व चारा या ठिकाणी आणून टाकला जातो. त्यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. पाऊस झाल्यास दुर्गंधीचे प्रमाण आणखी वाढते. त्यामुळे या ठिकाणी कचरा टाकण्यास जवळपासच्या नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. मात्र अगदी रस्त्यावरच पुन्हा कचरा टाकला जात आहे.कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी संतोष सुरपाम व रेमाजी सरपे यांनी कचऱ्याला आग लावली. मात्र काही वेळातच सदर आग विझविण्यात आली. या कचऱ्याच्या ढिगामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या ठिकाणी कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई करावी, त्याचबरोबर कचरा टाकण्यास कायमचे प्रतिबंध घालण्यात यावे, अशी मागणी संतोष सुरपाम व रेमाजी सरपे यांनी केली आहे.मार्र्कंडादेव येथे तिर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक येतात. रस्त्यावरील कचरा बघून चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.
मार्र्कं डात कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:55 PM
चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे अगदी रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे टाकण्यात आले आहे. याचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना होतो.
ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : दंडात्मक कारवाई करण्याची मागणी