शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

बाजारपेठ ४ वाजेपर्यंतच राहणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:24 AM

गडचिराेली : जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी नवीन आदेश जाहीर केले आहेत. त्यामध्ये २८ जूनपासून बाजारपेठ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच ...

गडचिराेली : जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी नवीन आदेश जाहीर केले आहेत. त्यामध्ये २८ जूनपासून बाजारपेठ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवा, कृषीविषयक दुकाने, संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील. उर्वरित सर्व दुकाने शनिवारी व रविवारी बंद राहतील.

गडचिराेली जिल्हा सुरुवातीला श्रेणी-३ मध्ये हाेता. त्यामुळे सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी दिली हाेती. मात्र मागील आठवड्यात श्रेणी-१ मध्ये समावेश झाल्याने आठवड्यातील सर्वच दिवस दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली हाेती. मात्र डेल्टा या नवीन प्रकारातील काेराेना विषाणूचे राज्यात हाेत असलेले संक्रमण लक्षात घेऊन शासनाने १ व २ स्तर रद्द केले आहेत. या दाेन स्तरांतील जिल्ह्यांना तीन स्तरांवरील निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी रविवारी नवीन आदेश जाहीर केले आहेत. त्यामध्ये २८ जूनपासून पुढील आदेशापर्यंत गडचिराेली जिल्ह्यातील बाजारपेठ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवा, कृषीविषयक दुकाने, संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील. उर्वरित सर्व दुकाने शनिवारी व रविवारी बंद राहतील.

बाॅक्स ....

लग्नासाठी ५० नागरिकांची उपस्थिती

-यापूर्वीच्या आदेशात लग्न समारंभासाठी १०० नागरिक उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली हाेती. मात्र आता केवळ ५० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न आटाेपावे लागणार आहे.

-अंत्यविधीसाठी २० लाेकांना उपस्थित राहता येणार आहे.

- सामाजिक, सांस्कृतिक, मनाेरंजनात्मक कार्यक्रम हाॅलमध्ये घ्यायचे असल्यास ते सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घेता येईल. सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती नसावी.

बाॅक्स ....

शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती

शासकीय कार्यालये साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के असावी. त्याहून अधिक उपस्थिती गरजेची असल्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी लागेल.

बाॅक्स ......

हाॅटेल्स साेमवार ते शुक्रवारच

- रेस्टारंट, उपहारगृह हे साेमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. एकूण क्षमतेच्या ५० टक्केच डायनिंग व्यवस्था ठेवता येईल, इतर वेळेस पार्सल, हाेमडिलिवरी सुरू ठेवता येईल.

- माॅल, सिनेमागृह, नाट्यगृह पुढील आदेशापर्यंत बंद राहतील

बाॅक्स .....

सलून साेमवार ते शुक्रवार

व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर हे साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. यासाठी ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. एससीचा वापर करता येणार नाही.

- सार्वजनिक वाहतूक १०० टक्के क्षमतेसह सुरू ठेवता येईल. मात्र उभ्याने प्रवास करण्यास प्रतिबंध असेल.

बाॅक्स ....

५ वाजतानंतर संचारबंदी

- सायंकाळी ५ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वैध कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई असेल. तसेच सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकत्रितरीत्या ५ पेक्षा अधिक लाेकांना एकत्र जमण्यास मज्जाव असेल.

- शाळा, महाविद्यालये, काेचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद असतील.